शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
2
भाजपा खासदाराच्या बहि‍णीला भररस्त्यात दांडक्याने बेदम मारले; Video व्हायरल, नेमका प्रकार काय?
3
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
4
Online Food: Zomato नंतर Swiggy वरुनही ऑनलाइन जेवण मागवणं पडेल महागात, जीएसटीचाही परिणाम दिसणार
5
"डीजेमुळे वादनच झालं नाही", पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत आला अत्यंत वाईट अनुभव, सौरभ गोखले म्हणाला...
6
घरातल्या एसीचा भयानक स्फोट; पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर
7
Ganesh Visarjan: मुंबईमध्ये २२ वर्षांत पहिल्यांदाच मोजला नाही विसर्जनाचा ‘आवाज’
8
१०० रुपये ते ५० कोटींचा मालक... शुभमन गिल क्रिकेटशिवाय 'या' २० ठिकाणांहून कमवतो बक्कळ पैसा
9
मुंबई महापालिका: महापौरपद, स्टँडिंग कमिटी भाजपला पाहिजे!
10
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
11
उत्पन्न कमी असले तरीही चिंता नाही! 'या' १० स्मार्ट टिप्स वापरुन तुम्ही व्हाल कोट्यधीश
12
'नेटवर्क्ड ब्लू वॉटर फोर्स'..! २०० हून अधिक युद्धनौका, पाणबुड्यांसह भारतीय नौदलाचा जबरदस्त प्लॅन
13
आजचे राशीभविष्य - ८ सप्टेंबर २०२५; गुंतवणूक करताना सावध राहा, वाणीवर संयम ठेवा!
14
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
15
...पण घर सोडणार नाही, असं ते का म्हणताहेत? शहरांची ही मोठी शोकांतिका
16
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
17
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
18
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
19
"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
20
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड

तीन वर्षांपासून विकासकामे ठप्प

By admin | Updated: September 1, 2014 00:08 IST

येथील नगर परिषदेच्या प्रभाग क्रं. १ मध्ये गत तीन वर्षांपासून विकासकामे ठप्प आहेत. या प्रभागात गेल्या तीन वर्षात रस्ते, नाल्या व इतर मुलभूत सोईसुविधांचे एकही काम झाले नसल्याने येथील

आर्वी : येथील नगर परिषदेच्या प्रभाग क्रं. १ मध्ये गत तीन वर्षांपासून विकासकामे ठप्प आहेत. या प्रभागात गेल्या तीन वर्षात रस्ते, नाल्या व इतर मुलभूत सोईसुविधांचे एकही काम झाले नसल्याने येथील नागरिक रोष व्यक्त करीत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी व प्रभागातील एकतरी काम व्हावे अशी नागरिकांद्वारे केली जात आहे. आर्वी नगर परिषदेमध्ये सध्या भाजपाची सत्ता आहे. या पक्षाच्या प्रभागातील विकासकामांच्या भूमिपूजनाचा सपाटा सध्या आर्वीत सुरू आहे. यात काँग्रसच्या प्रभागातील मंजूर कामांचा ठराव विद्यमान नगरसेवकांनी रद्द करून आपल्याच प्रभागातील कामे करण्याचा सपाटा सुरू केलाचा आरोप होत आहे. या परिसरातील एलआयसी कॉलनी, संजय नगर, आंबेडकर वॉर्ड, साईनगर आदी भागातील सहा हजार नागरिकांना मुलभूत सोईसुविधेसाठी नगर परिषदेचे उंबरठे झिजवावे लागत आहे. त्यामुळे जनमानसात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रभागात कुठलेही विकासाचे काम न झाल्याने कॉग्रेसच्या माजी नगराध्यक्षा किरण मिस्कन यांनी भाजपा नगराध्यक्ष दुर्गेश पुरोहित यांना पत्र लिहून विकासकामे करण्याची व या प्रभागातील प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली आहे.आर्वी शहरातील प्रत्येक वार्डात घाणीचे साम्राज्य असून शहरातील कचरागाडीही बंद आहे. वॉर्डातील खुल्या जागेत गाजरगवत, अंतर्गत रस्त्यावर खड्डे, मायाबाई वॉर्डातील सार्वजनिक शौचालयात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. साईनगर येथील स्वामी समर्थ उद्यानाची दुरावस्था झाली आहे. परिसरातील नाला सफाई न झाल्याने या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे साईनगर परिसरातील सिमेंट रस्त्यांचे काम वर्क आर्डरनुसार नसल्याचे बोलल्या जात आहे. जिल्हा नियोजन समितीतून दलित वस्तीला निधी नाही. त्यामुळे त्या वस्त्यांचा विकासही खुंटला आहे. शासनाच्या लोकोपयोगी योजनांची जनजागृती नाही, रस्ता विकास निधी अंतर्गत प्रभागात समान वाटप नाही. अशी अनेक विकासकामे गत काही वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे या मागण्या तातडीने मान्य करून विकासकामे करण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)