शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कापसाने चांगलाच खाल्ला भाव; आता खरीपात पेराही वाढणारच राव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 05:00 IST

आनंद इंगोले लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोनाकाळात कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागल्याने कपाशीची लागवड कमी करून ...

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाकाळात कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागल्याने कपाशीची लागवड कमी करून शेतकऱ्यांनी सोयाबीनचे क्षेत्र वाढविले. यावर्षी कपाशीने चांगलाच भाव खाल्ला असून १५ हजार रुपये क्विंटलच्या घरात भाव मिळत असल्याने येत्या खरीपामध्ये शेतकऱ्यांकडून कपाशीची लागवड वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कृषी विभागाकडून कपाशीच्या वाढीव क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून शेतीची मशागत अंतिम टप्प्यात आहे. मान्सूनही आठ ते दहा दिवस आधी धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून कृषी विभागानेही खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन केले आहे. यावर्षी ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरवर खरीपाचे नियोजन असून यामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर व ज्वारी हीच पिके अनुक्रमे आघाडीवर आहेत. गेल्यावर्षी ४ लाख ४२ हजार ७७३ हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले होते. त्यापैकी ४ लाख १८ हजार ५६१ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड झाली होती. यावरूनच यंदाच्या खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी कपाशीचे २ लाख ४ हजार २०३ हेक्टरवर नियोजन करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात २ लाख १६ हजार ५५५ हेक्टरवर कपाशीची लागवड केली होती. हाच अंदाज विचारात घेऊन कृषी विभागाने मागील वर्षीपेक्षा यावर्षी नियोजनात वाढ केली आहे.

डिझेलच्या दरवाढीमुळे यांत्रिक खर्चात वाढ-    मागील काही महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीची मशागत करण्याच्या खर्चात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. परिणामी शेतकरी बैलजोडीचा आधार घेत असल्याचे दिसून येते. 

यावर्षी खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी २ लाख ४२ हजार २०३ हेक्टरवर नियोजन होते. परंतु प्रत्यक्ष ४ लाख १८ हजार ५६१ हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. यावर्षी ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. आवश्यक खतसाठा व बियाण्यांची मागणी करण्यात आली असून शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक खते व बियाण्यांची खरेदी करुन त्याच्या पावत्या जवळ ठेवाव्यात. कुठेही बोगसपणा आढळून आल्यास कृषी कार्यालयाकडे तक्रार करावी.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

 

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती