शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

नांदुराचा नेत्रहीन भगवान ठरला सूरसंगम स्मार्ट सिंगर

By admin | Updated: August 9, 2016 01:24 IST

साहित्य कला शोधक मंचाच्यावतीने स्व. मोहम्मद रफी स्मृती प्रित्यर्थ ३० वी विदर्भस्तरीय फिल्मी गीतगायन

वर्धा : साहित्य कला शोधक मंचाच्यावतीने स्व. मोहम्मद रफी स्मृती प्रित्यर्थ ३० वी विदर्भस्तरीय फिल्मी गीतगायन सूरसंगम स्मार्ट सिंगर स्पर्धा आयोजित होती. या स्पर्धेचा विजेता नांदूरा येथील भगवान बाभुळकर ठरला. विशेष म्हणजे तो नेत्रहीन आहे. स्पर्धेचा द्वितीय पुरस्कार चंद्रपूर येथील मुकेश मेहरा तर तृतीय पुरस्कार मकसुद खान याने पटकाविला. स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मोहन अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून विधीतज्ज्ञ अ‍ॅड. वैभव वैद्य, इमरान राही, डी.के. पाटील, लॉयन्स क्लब गांधी सिटीचे संचालक अनिल नरेडी, मंचचे अध्यक्ष सुनील बुरांडे, सचिव प्रभाकर उगेमुगे, मैत्री सामाजिक संस्थेचे सचिव पंकज घुसे मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविकातून सुनील बुरांडे यांनी ही स्पर्धा अखिल भारतीय स्तरावर वर्धेकरांच्या सहकार्याने करण्याचा मानस व्यक्त केला. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वधर्म समभाव, बंधुभाव अधिक बळकट व्हावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला वर्धेतील अ‍ॅड. असफ खान पटेल, अ‍ॅड. उदापूरकर, डॉ. अजय वाणे, दीपक अग्रवाल, कवी संजय इंगळे तिगावकर, कमलकिशोर शर्मा, अहेसान राही, विनोदकुमार सराफ, आदी अनेक मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन स्पर्धेचे कार्यवाहक दीपक मेने यांनी केले तर आभार विनीत पाराशर यांनी मानले. स्पर्धेत तीन पारितोषिकांसह प्रोत्साहन पुरस्कार मयूर पटाईत (वर्धा), विनोद सोनवणे (वर्धा) सतीश वानखडे (मदनी), बाळू हरणे (हिंगणघाट), हर्सना साबरी (नागपूर), सावेरी सोनी (वर्धा), स्मीत वंजारी (चंद्रपूर), प्रकाश गवारकर (वर्धा), प्रवीण पेटकर, (सिरूड) यांना देण्यात आला. स्पर्धेच्या प्रथम फेरीचे परीक्षण सुरेश सालबर्डे, नरेंद्र माहुलकर, जयंत भिरंगे यांनी पार पाडले. अंतीम फेरीचे परीक्षण सुरमणी वसंत जळीत, वीणा उदापूरकर वर्धा, विजय दुरूतकर, यवतमाळ यांनी केले. प्रभाकर उगेमुगे, विनित पाराशर, प्रमोद गुंडतवार, प्रशांत चवडे, दीपक मेने, हरिष कनोजे, डॉ. विजय लोखंडे, सुनील काळे, चंद्रजीत टागोर, सुनील इंगोले, नितीन पटवर्धन, श्रीकांत वाघ, प्रशांत हटवार, आनंद मुन, विलास कुलकर्णी, नरेंद्र नरोटे, प्रा. शिरीष सुतार, वासुदेव गोंधळे, प्रफुल केने, प्रा. सुनील अंभोरे, प्रा. विक्रांत रोटकर, अमर काळे, किशोर ढवळे, अ‍ॅड. अरूणा खरे, डॉ. संजीवनी लोखंडे, सूर्यकांत शेगावकर, श्याम दुर्गे, काशीनाथ गावंडे ही मंचाची मंडळी याप्रसंगी उपस्थित होती.(प्रतिनिधी)