जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने : धनगर समाज आणि आदिवासी कृती समितीचे धरणेवर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाज सेवा मंडळाचे दोन दिवसांपासून तर आदिवासी संघर्ष कृती समितीद्वार शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाद्वारे अनु़ जमातीत समाविष्ट केल्याच्या निर्णयावर अंमल करण्याची मागणी तर आदिवासी संषर्घ कृती समितीद्वारे या मागणीला विरोध केला जात आहे. यामुळे एकाच ठिकाणी एकाचे मागणीकरिता तर दुसऱ्याचे त्याच विरोधात धरणे आंदोलन सुरू असल्याचे अजब चित्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे.मागास असतानाही सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या धनगर समाजाला शासकीय सोई -सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. शासनाच्या अनु़ जमातीच्या यादीत अनु़ क्ऱ ३६ मध्ये समाविष्ट असताना अंमलबजावणी केली नाही़ यामुळे यावर त्वरित अंमल करावा, या मागणीकरिता दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. शनिवार हा या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. शनिवारी सुभाष ताल्हण, राजेंद्र पुनसे, धनराज त्रिकुळ, नागेश धोटे, पंजाब भोकटे, माणिक बुरांडे, सुधाकर निरदर, दिलीप गोरडे, दिलीप ताल्हण आदी उपोषणाला बसले आहेत. मागणीचे निवेदन देण्याकरिता जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. आदिवासी संघर्ष कृती समितीच्यावतीने धरणे देण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवदेन मुख्यमंत्री यांना देण्याकरिता जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवदेनान धनगर ही जात आहे तर आदिवासी ही जमात नाही. धनगर समाजाला यापूर्वी ३.५ टक्के आारक्षण घोषित करून एन.टी. क या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे; पण आदिवासी समाजाचे मागासलेपण व त्यांना विविध क्षेत्रात मिळणारे ७ टक्के आरक्षण डोळ्यासमोर ठेवत धनगर समाजाचा हा राजकीय डाव असल्याचा आरोप आदिवासी संघर्ष कृती समितीने केला आहे. यावेळी ज्ञानेश्वर मडावी, नामदेव मसराम, नरेंद्र मसराम, तानबा उईके, भीमा आडे, शरद आडे, सचिन भलावी, रेखा कुंभरे यांच्यासह समाजबांधवांची उपस्थिती होती़(प्रतिनिधी)
शनिवार ठरला आंदोलनांचा वार
By admin | Updated: August 3, 2014 00:14 IST