शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

प्रवाशांच्या सेवेसाठी ‘ब्रीद’चा विसर

By admin | Updated: August 30, 2014 23:59 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक बसवरील मोनोवर ‘प्रवाशांच्या सेवेत’ हे गोंडस ब्रीदवाक्य लिहून ठेवले आहे; पण खरोखरच परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी आहे काय,

पुलगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक बसवरील मोनोवर ‘प्रवाशांच्या सेवेत’ हे गोंडस ब्रीदवाक्य लिहून ठेवले आहे; पण खरोखरच परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी आहे काय, असा सवाल संतप्त प्रवासी उपस्थित करीत आहेत़ गत दहा वर्षांत प्रवास भाडेवाढ, भंगार अवस्थेतील बसेस, अनियमितता, हात दाखवा बस थांबवाला हरताळ, विनंती थांब्यावर बस न थांबविणे आदी प्रकारामुळे प्रवाशांमध्ये असंतोष पसरला आहे़ राज्य परिवहन मंडळाची स्थापना होऊन जवळपास ६ दशके होत आहेत़ या सहा दशकांत आणि आजही आरामदायी व सुरक्षित प्रवासाकरिता प्रवाशी परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना प्राधान्य देतात़ मध्यंतरी खासगी प्रवासी वाहनांमध्ये अनेक प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्याने व आकर्षक आरामदायी गाड्यांमुळे प्रवासी खासगी बसकडे आकर्षित झाले होते़ यामुळे परिवहन महामंडळ आर्थिक डबघाईस आले; पण परिवहन मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षात संगीतमय व मनोरंजनात्मक प्रवासासाठी अनेक बसमध्ये स्टिरिओ व व्हीडिओ सेवा सुरू करून प्रवाशांचे लक्ष वेधले़ स्थानिक आगारानेही पुलगाव ते अंजनगाव (सुर्जी) ही व्हीडीओकोच सेवा सुरू केली होती; पण काही महिन्यांतच या योजनेचा फज्जा उडाला़ पुढे प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वागणूक ठेवून प्रवासी जोडो अभियान, सुरक्षा सप्ताह, हात दाखवा बस थांबवा, अलिकडेच सौजन्यपूर्ण वागणुकीसाठी चालक व वाहकांनी बसच्या गेटवर प्रवाशांचे हसतमुखाने स्वागत करावे, असे अनेक उपक्रम प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सुरू करण्यात आलेत; पण अनेक चालक, वाहक या उपक्रमांना बगल देत असल्याचे दिसून येते़गत १० वर्षांमध्ये परिवहन महामंडळाने प्रवाशी भाड्यात जवळपास दुपटीने वाढ केली आहे़ वास्तविक, भाडेवाढ करणे गरजेचे आहे; पण त्याच्या तुलनेत योग्य सेवा देणेही तेवढेच गरजेचे आहे़ सध्या असलेल्या भंगार गाड्या, चालक, वाहकांची प्रवाशांशी वागण्याची पद्धत, वेळापत्रकानुसार न चालणाऱ्या गाड्या, सुट्या पैशांसाठी होणारे वाद, बसस्थानकावरील अव्यवस्था आदी बाबी प्रवाशांना क्लेषदायक ठरत आहेत़ प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्याचे सार्थक करायचे असेल व परिवहन महामंडळाला भरभराटीचे दिवस आणायचे असतील तर परिवहन महामंडळाने या बाबींकडे गांर्भीयाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे़ किमान अनियमित सुटणाऱ्या बसेसही तालावर आणल्या तरी प्रवाशांना हायसे होणार आहे़(तालुका प्रतिनिधी)