ग्रामस्थ बुचकळ्यात : मोरांगणा ग्रामपंचायतीची अफलातून शक्कलखरांगणा (मो.) : पाणी पिल्यावर फेकून देण्यात येत असलेल्या मिनरल वॉटरच्या प्लास्टिक बाटल्या पर्यावरणाला घातक ठरतात. या बाटल्यांचा उपयोग पथदिव्यांच्या संरक्षणाकरिता करण्याची अफलातून शक्कल मोरांगणा ग्रा.पं. च्या कर्मचाऱ्यांनी लढविली आहे. वादळ, वारा, पावसात सार्वजनिक दिवाबत्तीचे बल्ब नेहमी फ्यूज होतात वा फुटतात. यामुळे ग्रा.पं.ला अधिकचा भुर्दंड सोसावा लागतो. एका सीएफएल बल्बची किंमत २५० ते ३०० रुपये आहे. त्याला संरक्षीत केल्यास ग्रा.पं. ची शेकडो रुपयांची बचत होऊ शकते. ही कल्पना अंगिकारून प्लास्टीकच्या रिकाम्यान बाटल्या लावण्याचा प्रयोग ग्रा.पं. सरपंच विनायक कौरती व कर्मचाऱ्यांनी केला. मिनरल वॉटरची रिकामी बाटली खालून कापली जाते. बाटलीच्या झाकणास दोन छिद्रे पाडून त्यातून वायर आत टाकून होल्डर बसविले जाते. बल्ब लावून झाकण बाटलीला फीट केले. या युक्तीमुळे वादळात बल्ब खांबावर आदळला तरी फुटत नाही व पाऊस आला त्यात पाणी जात नाही. यामुळे आयुष्यमान वाढते व ग्रा.पं. ची बचत होते. ही फायद्याची अफलातून शक्कल अन्य ग्रा.पं. ने अमलात आणल्यास शासनाच्या निधीची बचत होणे शक्य आहे.(वार्ताहर)
‘मिनरल वॉटर’च्या बाटल्या बनल्या पथदिव्यांचे सुरक्षा कवच
By admin | Updated: August 21, 2015 02:33 IST