प्रवाशांची गैरसोय : वाहकांच्या दुर्लक्षामुळे महिलांची कुचंबनातळेगाव (श्या.पंत.) : राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये आरक्षणाच्या नियमांचे पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. आरक्षणाच्या आसनावर इतर कोणताही प्रवासी बसत असल्यामुळे नियम धाब्यावर बसविल्या जात आहे. वाहक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने महिलांची चांगलीच कुचबंना होत आहे. महामंडळाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमध्ये आमदार, खासदार, परिवहन विभागाचे कर्मचारी, महिला, अधिस्वीकृत पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक व अपंगासाठी जागा राखीव असतात. प्रत्येक एसटीमध्ये जवळपास ४५ ते ५० प्रवासी बसू शकतात. यामध्ये आरक्षित केलेल्या आसनाचा समावेश आहे. बसमध्ये दररोज प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे कोणताही प्रवासी बसमध्ये प्रवेश करताच आपल्या सोयीच्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न करतो. एसटीमध्ये आरक्षित आसन असतानाही त्यावर कोणताही प्रवासी बसल्याचे दिसून येते. यामध्ये बरेचदा म्हातारी मंडळी, महिला उभ्याने प्रवास करताना दिसतात. लांब पल्यांच्या बसमध्ये आरक्षणाच्या नियमांचे थोड्या प्रमाणात का होईना पालन होत असल्याचे दिसते. मात्र सर्वसाधारण कमी अतंराच्या वेळी आरक्षणाची एैसीतैसी झाल्याचे दिसून येते. बरेचदा महिलाच्या जागेवर पुरुष बसले असतात. त्यामुळे आरक्षण व अधिकार असतानाही बसमध्ये महिलांना उभे रहावे लागते. अशावेळी एखाद्या महिलेने जागेबाबत अधिकार सांगताच तिच्याशी वाद घातला जातो. एसटी प्रशासनाचे तसेच बसमधील वाहकही याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आरक्षण हे नावापुरतेच असल्याचे दिसून येत आहे.वृद्ध व अपंग एसटीचा प्रवास जास्त करतात. त्याच्याकरिता वाहकामागील आसनावर आरक्षित असते. मात्र वाहक प्रवाश्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे वृद्ध व अपंग नागरिकांना आरक्षणाचा फायदा मिळत नाही. प्रसंगी त्यांना उभेच राहावे लागतात.(वार्ताहर)
आरक्षण नियमांची पायमल्ली
By admin | Updated: August 19, 2014 23:54 IST