देवळी : अनुसूचित जमातीतील धनगड व धनगर ही एकच जमात असताना केवळ ‘र’ व ‘ड’ चा भेद करून धनगर जमातीला शासनाच्या सवलती पासून हेतूपुरस्पर वंचीत ठेवले जात आहे. ही बाब पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी आहे. त्यामुळे या समाजाला अनुसूचित जमातीमध्ये सामावून घ्यावे, या मागणीसाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार जितेंद्र कुंवर यांची भेट घेवून निवेदन सादर केले.धनगर समाजाच्या या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून लढा दिला जात आहे. संविधानानुसार न्याय, हक्क, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रत्येक घटकाचा आधिकार असतांना, शासन मात्र या समाजाच्या अधिकाराबाबत दुजाभाव करीत आहे. राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक ३६ वर धनगड या जमातीचा समावेश करण्यात आला आहे. केवळ ‘र’ व ‘ड’ चा फरक न मानता धनगड व धनगर ही एकच जमात असल्याचे घटनेच्या अभ्यासकांनी मान्य केले आहे. तरी या समाजाला त्याच्या अधिकारापासून वंचीत ठेवले जात आहे राज्यातील दीड कोटी धनगर समाजाचा शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतीक विकास थांबला आहे. शिष्टमंडळात घोडे, वैद्य, थोटे, बिडकर, भुजाडे, ढोक, तिनघसे, तागड व समाज बांधवांचा सहभाग होता.(प्रतिनिधी)
धनगर समाजाचे तहसीलदाराला निवेदन
By admin | Updated: September 1, 2014 23:47 IST