सरपंचपदाची निवडणूक : अनेक ठिकाणी सत्तापरिवर्तनवर्धा: साटोडा-आलोडी ग्रामपंचायतीवर राकाँ-भाजप समर्थित आघाडीच्या युतीने सत्ता स्थापन केली आहे. सरपंचपदी राकाँच्या प्रिती शिंदे, तर उपसरपंचपदी भाजपच्या रेखा फुकटे यांची वर्णी लागली.निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित परिवर्तन ग्रामविकास आघाडीचे ५, जनता जनार्दन आघाडीचे २, भाजपा समर्थित जनहितार्थ ग्रामविकास आघाडीचे ३ तर काँग्रेस समर्थित ग्रामविकास आघाडीचे ७ उमेदवार निवडून आले होते. राष्ट्रवादीने भाजपासोबत हातमिळवणी करीत ग्रामपंचायतीवर झेंडा फडकाविला. सरपंच पदाकरिता झालेल्या निवडणुकीत प्रिती शिंदे यांना ९ मते तर विद्या मेहेर यांना ८ मते मिळाली. उपसरपंच पदाकरिता झालेल्या निवडणुकीत रेखा फुटाणे यांना ९ तर कल्पना वाटकर यांना ८ मते मिळाली. युती राकाँचे समीर देशमुख व भाजपाचे जि.प. सदस्य अविनाश देव व श्याम गायकवाड यांच्या पुढाकारातून झाली.(शहर प्रतिनिधी)
साटोडा ग्रा.पं.वर राकॉँ-भाजपची सत्ता
By admin | Updated: August 5, 2015 02:12 IST