वर्धा : महाराष्ट्रात ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे़ या समाजाला राज्य घटनेनुसार दिलेले अधिकार व हक्कांबाबत राजकीय व प्रशासकीय स्तरावर पाहिजे त्या प्रमाणात गांभीर्याने दखल घेतली जात नाही. सतत ओबीसी समाजावर अन्याय केला जातो़ या अन्यायाविरूद्ध शासन दरबारी दबाव गट निर्माण करण्याच्या दृष्टीने ओबीसी समाजात येणाऱ्या सर्व जाती घटकांना संघटीत करण्यासाठी ओबीसी महासंघातर्फे जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे़या अभियानांतर्गत प्रत्येक गाव व घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे़ ‘गाव-गाव चलो, घर-घर चलो, ओबीसी जोडो’चा शुभारंभ दादाजी धुनीवाले देवस्थान येथून करण्यात आला़ यावेळी ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील बुरांडे, विदर्भ प्रदेशाध्यक्ष निळकंठ पिसे, विदर्भ कार्याध्यक्ष गजानन राऊत, सरचिटणीस निर्गुण खैरकार, अशोक बोरकर, जि.प. सदस्य मिलिंद भेंडे, माजी सरपंच सुनील कोल्हे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सीताराम भूते, छोटु पवार, वसंत पंचभाई, नगरसेविका माया उमाटे, प्रमोद ठाकरे, मालती ठाकरे, शरयू वांदिले, बाळासहेब वानखेडे, माजी नगरसेविका वीना दाते, महिला जिल्हाध्यक्षा शीला ढोबळे, शहर अध्यक्ष वनमाला चौधरी, सरचिटणीस मंगला भंडारी, कार्याध्यक्षा रिमा चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष वनीता धामंदे, अल्का भूगोल आदी उपस्थित होते़ धुनीवाले समाधीसमोर श्रीफळ फोडून अभियानास प्रारंभ झाला़ या अभियानात मारोती मरगडे, जयंत भालेराव, दामोधर मुडे, राम भागवत, वसंत उघडे, इश्वर पवार, संजय बानोडे, नितीन ठाकरे, रामराव किटे, शेखर राऊत, विठ्ठल गुल्हाणे, विजय देशमुख, सतीश बजाईत, प्रकाश खंडार, सुरेश हलमारे, विनय डहाके, शैलेश येळणे, वानखेडे आदी सहभागी झालेत़(स्थानिक प्रतिनिधी)
ओबीसी महासंघाचे जनजागृती अभियान
By admin | Updated: July 17, 2014 00:17 IST