शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

बाप्पांच्या मिरवणुकीत खड्ड्यांचे अडथळे

By admin | Updated: August 31, 2014 00:00 IST

जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे. पुलगावचा राजा समजल्या जाणाऱ्या उत्तरभारतीय गणेश मंडळाच्या १६ फुटी गणेशोत्सवासह शहरी भागात २५ ठिकाणी तर ग्रामीण भागात

पुलगाव : जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू झाली आहे. पुलगावचा राजा समजल्या जाणाऱ्या उत्तरभारतीय गणेश मंडळाच्या १६ फुटी गणेशोत्सवासह शहरी भागात २५ ठिकाणी तर ग्रामीण भागात १८ ठिकाणी गणपती बाप्पा दहा दिवसाच्या मुक्कामासाठी विराजमान झाले. विसर्जनप्रसंगी शहरात भव्य मिरवणूक काढली जाते. परंतु यंदा मिरवणुकीला खड्ड्यांचे अडथळे पार करावे लागणार आहे. शहरातील महाराष्ट्र बँकेलगत विशाल अशा मंचावर फुलाची खास आरास लावून राजांची मूर्ती शेकडो भाविकांचे उपस्थितीत विराजमान करण्यात आली. शहरातील भगतसिंग चौकातील बाल हिंद गणेश मंडळ, हिंगणघाट फैलातील आशीर्वाद सर्व धर्मसमभाव गणेश मंडळ, तेलघानी फैलातील चंद्रशेखर आजाद गणेश मंडळ, नाचणगाव रोडवरील आर. के. गणेशमंडळ या मोठ्या गणेश मंडळासह शहरातील प्रत्येक भागात मांगल्यपूर्ण वातावरणात २५ सार्वजनिक मंडळात गणरायाची विधीवत स्थापना करण्यात आली. तर नाचणगावसह ग्रामीण शहरातही बाप्पा विराजमान झाले.शालेय विद्यार्थ्यांना सार्वजनिक गणेशोत्सवाची महती कळावी म्हणून ज्ञानभारती विद्यालयात मागील पाच वर्षापासून गणरायाची स्थापना केली जाते. या उत्सवात एकाकडून एक सरस देखावे विद्यार्थ्यांच्या कलाकृतीत साकारले जातात. दहा दिवसांच्या गणेशोत्सवासाठी गणेशभक्तांच्या सेवेत सर्कस ग्राउंडवर मिना बाजारही डेरेदाखल झाला आहे. बाप्पाच्या या उत्सवात १०-१५ दिवसांत जवळपास लाखोची आर्थिक उलाढाल होत असते तर जवळपास २००-२५० बरोजगार हातांना विविध व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार मिळतो.परंतु वेळी-अवेळी होणारे वीजेचे भारनियमन, पावसाचा लहरीपणा, किंवा भाद्रपद हिटचा उन्हाचा फटका बसत असतानाच शहरातील अंतर्गत रस्त्यावर पडलेल खड्डे, रस्त्यावर लोंबकळणाऱ्या विजेच्या केबल कनेक्शनच्या तारा या गोष्टी गणरायाच्या मिरवणुकीसाठी अडथळा बनणार असे चित्र दिसत आहे. बंद पथदिवेही यात भर घालत आहे.पुलगाव-नाचणगाव रस्त्यावर नव्याने तयार झालेल्या तिनही पुलाच्या दोन्ही बाजूची माती वाहून गेल्याने पडलेले खड्डे, विद्युत वितरण कंपनी समोरील रस्त्यावरील थातुरमातूर, बुजविलेली नाली, एक्स्प्रेस हायवेच्या शिवाजी चौकात असलेल्या चोरस्त्यावरचा मोठा खड्डा, पंचधारा रोडवरील खाचखळगे, मील कडून नदीकडे जाताना रेल्वे फाटका जवळील रस्त्यावरील खड्डे प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे कायम असून गणेश मिरवणुकींना अडथळाचे ठरणार आहे. गणेशोत्सवासाठी वीज, पाणी, प्रकाश व्यवस्था, रस्ते या समस्यांकडे लक्ष देवून विशेष व्यवस्था संबंधित अधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे. त्यामुळे खड्डे बुजवून वीज, पाण्याची व्यवस्था तात्काळ करावी करण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)