लोकमत न्यूज नेटवर्क नारायणपूर : मागील चार दिवसांपासून शेतशिवारात मुक्त संचार करणाऱ्या पट्टेदार वाघाने पुन्हा एकदा पाळीव जनावरांना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ला चढविल्याने नारायणपूरसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने वेळीच या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर गावाच्या सभोवताच्या परिसरात गेल्या चार दिवसांपासून एका वाघाने आपला मुक्कामच ठोकला आहे. हा वाघोबा रात्रीच्या सुमारास बांधून असलेल्या पाळीव जनावरांवर हल्ला चढवून त्यांना जखमी करीत असल्याने पशुपालकांच्या अडचणीत भर पडली आहे. बल्लारपूर येथील शेतकरी बळीराम वैद्य यांच्या मालकीची दोन जनावरे वाघाने फस्त केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री उशीरा गणेशपूर येथील विठ्ठल रोकडे तसेच नारायणपूर येथील चंद्रकांत पुसदेकर यांच्या मालकीच्या जनावरांवर हल्ला चढवून वाघाने त्यांना जखमी केले आहे. नारायणपूर शिवारात काही ठिकाणी झुडपी जंगल असून याच भागातून हा वाघोबा शेत शिवाराकडे येत असल्याचे बोलले जात आहे. वाघाच्या दहशतीमुळे शेतमजूर आणि शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. सदर नुकसानग्रस्त पशुपालकांना वनविभागाने शासकीय मदत द्यावी, तसेच या वाघाचा वेळीच बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नारायणपूर भागातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी केली आहे.
वाघाच्या हैदोसाने नारायणपूरवासी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST
बल्लारपूर येथील शेतकरी बळीराम वैद्य यांच्या मालकीची दोन जनावरे वाघाने फस्त केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री उशीरा गणेशपूर येथील विठ्ठल रोकडे तसेच नारायणपूर येथील चंद्रकांत पुसदेकर यांच्या मालकीच्या जनावरांवर हल्ला चढवून वाघाने त्यांना जखमी केले आहे. नारायणपूर शिवारात काही ठिकाणी झुडपी जंगल असून याच भागातून हा वाघोबा शेत शिवाराकडे येत असल्याचे बोलले जात आहे. वाघाच्या दहशतीमुळे शेतमजूर आणि शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत.
वाघाच्या हैदोसाने नारायणपूरवासी हैराण
ठळक मुद्देशेतकऱ्यांसह ग्रामस्थ दहशतीत : पुन्हा दोन गाईंवर चढविला हल्ला