शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

कामकाजाच्या वेळातच कार्यालयाला कुलूप

By admin | Updated: June 8, 2014 00:06 IST

कार्यालयीन वेळेच्या आधीच येथील पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाला कुलूप लावून कार्यालय बंद करण्याचा प्रकार शुक्रवारी निदर्शनास आला. त्यामुळे कार्यालय या दिवशी सुरू होते वा नाही, याबाबत शंका व्यक्त

घोराड : कार्यालयीन वेळेच्या आधीच येथील पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाला कुलूप लावून कार्यालय बंद करण्याचा प्रकार शुक्रवारी निदर्शनास आला. त्यामुळे  कार्यालय या दिवशी सुरू होते वा नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. शनिवारीसुद्धा हे कार्यालय सकाळी ८.३0 पर्यंत उघडलेलेच नव्हते. त्यामुळे सर्वत्र चर्चेला उत आला आहे.सेलू येथील लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता कुलूपबंद होते. या चिकित्सालयाकडून जात असताना हा प्रकार दिसून आला. या कार्यालयाला कुलूप लावून असले तरी येथे लावलेल्या फलकावर फेब्रुवारी ते सप्टेंबर या महिन्यात सकाळी ७ ते १२ वाजतापर्यंत व सायंकाळी ४ ते ६ पर्यंत सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन वेळ आहे तर या महिन्यादरम्यान  येणार्‍या शनिवारी ७ ते १२ ची वेळ आहे. तसा फलक लागला आहे. ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यात सकाळी ८ ते दुपारी १, विश्रांतीनंतर दुपारी ३ ते सायंकाळी ५ अशी वेळ असल्याचा फलक आहे. आता जून महिना सुरू आहे. सायंकाळी ६ वाजण्यापूर्वीच लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय बंद दिसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत असून सर्वत्र चर्चा सुरू आहे.सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र शासनांतर्गत येथे कार्यालय आहे. सेलू शहरातील पशू चिकित्सा येथे केली जाते. त्यासाठी शासनाने सुसज्ज इमारतही बांधली आहे. पण येथील परिस्थिती पाहता हे कार्यालय कधी वेळेत उघडले नाही व बंद झाले नाही, असेही परिसरातील नागरिकांकडून सांगितल्या जात    आहे. या कार्यालयात ३ प्रथमश्रेणी अधिकारी असल्याचे समजते. हे तिघेही मुख्यालयी राहत नाही. ५ वाजता हे कार्यालय बंद दिसल्यानंतर कार्यालय बंद करण्याची वेळ ६ वाजताची फलकावर दिसल्याने सदर प्रतिनिधी ६ वाजतापर्यंत कुणीतरी अधिकारी येईल याची प्रतीक्षा करीत थांबला. पण कुणीही ६ वाजून ५ मिनिटापर्यंत आले नाही. तर दुसर्‍या दिवशीही ८.३0 पर्यंत कुलूप बंदच होते.या दिवशी अधिकारी कुठे गेले, कार्यालय कामकाजाच्या वेळात बंद का याबाबतची चौकशी वरिष्ठ पातळीवरून होणे आवश्यक आहे. शासकीय अधिकारी वेळेचे भान न पाळत कामात हयगय करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांद्वारे केली जात आहे.(वार्ताहर)