शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

लॉकडाऊनमुळे कर थकला दोन टक्के दंडाचा भार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:00 IST

महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार नगरपंचायत व नगरपालिकांचा कर १ एप्रिल या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देय असतो. मालमत्ताधारकांनी हा कर ३१ मार्चपूर्वी न भरल्यास महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ या उपविधीचा अंगीकार केलेला असल्यामुळे कलम १५० अ (१) नुसार दोन टक्के शास्ती (दंड) लावण्याची तरतूद अधिनियमात आहे.

ठळक मुद्देमालमत्ताधारकांची आर्थिक कोंडी : पालिकांना शासनाच्या मार्गदर्शनाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यभरात कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. अनेकांचा रोजगारही हिरावला तसेच संचारबंदीमुळे नागरिक नगरपालिका व नगरपंचायत कार्यालयात येऊन मालमत्ता कर देऊ शकले नाही. परंतु, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियमांतर्गत मालमत्ताधारकांना दोन टक्के दंड भरावा लागणार असल्याने राज्यभरातील मालमत्ताधारकांची आर्थिक कोंंडी झाली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाकडून नगरपंचायत व नगरपालिकांना अद्याप मार्गदर्शन मिळाले नसल्याने अंमलबजाणी करताना त्यांचीही पंचाईत होत आहे.महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार नगरपंचायत व नगरपालिकांचा कर १ एप्रिल या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देय असतो. मालमत्ताधारकांनी हा कर ३१ मार्चपूर्वी न भरल्यास महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ या उपविधीचा अंगीकार केलेला असल्यामुळे कलम १५० अ (१) नुसार दोन टक्के शास्ती (दंड) लावण्याची तरतूद अधिनियमात आहे. मात्र, मार्च महिन्यातच कोरोना विषाणूचा प्रकोप वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आले.संचारबंदी लागू असल्याने मालकत्ताधारकांना पालिका किंवा नगरपंचायतीचा मालकत्ता कर भरता आला नाही. यामुळे नियमित करदात्यांनाही आता दोन टक्के दंडाची रक्कम भरावी लागत आहे. आधीच मालमत्ता कर भरणारे नागरिक आर्थिक संकट असताना आपत्तीकाळात मालमत्ताकरावरील व्याज भरताना नागरिकांची मोठी अडचण होत आहे. यामुळे या कोरोना संकटाच्या आपत्तीकाळात हा दंड माफ करण्याची गरज व्यक्त होत आहे. शिवाय तशी वर्धा शहरातील नागरिकांचीही मागणी आहे.शासनाने आपत्तीकाळात तत्काळ जनहितार्थ निर्णय घ्यावाकेंद्र सरकारने इतर आर्थिक बाबींसाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढ दिली आहे. त्याचप्रमाणे नगरपालिका व नगरपंचायतीचा मालमत्ता कर भरण्याकरिता नागरिकांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, तसेच त्यावरील २ टक्के व्याजाची रक्कम रद्द करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे वर्धा नगरपालिकेने संचालनालयाशी संपर्क साधून विचारणा केली असता याबाबत कोणताही आदेश नसल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे जनहिताच्या दृष्टिकोनातून त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी वर्धा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, सदस्य श्रेया देशमुख, वरुण पाठक, कैलास राखडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. निवेदन नगरविकास मंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री आदींना पाठविण्यात आले आहे.कोरोनामुळे नागरिकांवर आधीच आर्थिक संकट ओढवले आहे. संचारबंदी व आर्थिक कोंडीमुळे नियमित असलेले करदातेही मालमत्ता कर भरू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना आता दोन टक्के व्याज भरण्याची वेळ आली आहे. नागरिकांकडून हे व्याज माफ करण्याची मागणी होत आहे. पण, शासनाने मार्गदर्शक सूचना किंवा उपाययोजना केल्या नसल्याने पालिकेचीही अडचण होत आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ निर्णय घेऊन राज्यातील मालमत्ताधारकांना दिलासा द्यावा.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTaxकर