सीए-सीपीटीत राज्यात हनी बत्रा अव्वलश्रेया केने - वर्धाकोणत्याही विषयाचा अभ्यास करताना मूळ संकल्पना काय आहे, हे समजून घेतल्यास विषय सोपा होतो. परीक्षेचा ताण घेऊन अभ्यास केल्यास निश्चितच तुमच्या परीक्षेवर विपरित परिणाम होतो. तणावमुक्त रहा व नियोजनबद्ध अभ्यास करा, असे मत आहे, हनी बत्रा याचे! सीए-सीपीटी परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या हनीने त्याचे यशाचे गमक लोकमतशी बोलताना उलगडले. वर्धेकर असलेल्या हनीचे शिक्षण इयत्ता बारावीपर्यंतचे केंद्रीय शिक्षा बोर्डातून झाले. वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण घेण्यासाठी त्याने दिल्ली येथील श्रीराम कॉलेज आॅफ कॉमर्स येथे प्रवेश घेतला आहे. तो म्हणाला, अभ्यास करताना मी विषयाची काठिण्य पातळी पाहतो व मूळ संकल्पना समजून घेण्याकडे माझा कल असतो. सीए म्हणजेच सनदी लेखापाल परीक्षेचा अभ्यासक्रम अत्यंत कठीण समजला जातो. यामुळे बरेच विद्यार्थी परीक्षेपूर्वी घाबरतात आणि त्याचा परिणाम परीक्षेवर होऊन कमी गुण मिळतात. तणावमुक्त होऊन पेपर सोडव, असा सल्ला माझा भाऊ सीए निरज बत्रा मला नेहमीच देतो. याचा मला फायदा झाला. वेळापत्रकावर तो म्हणतो, परीक्षेच्या दोन महिन्यांपूर्वी चाप्टरनुसार अभ्यासाचे वर्गीकरण केले़ यामुळे सुसुत्रता आली. खुप शेड्युल तयार करून अभ्यास केल्याने यश मिळतेच, असे नाही. विषयाची मूळ संकल्पना कळली नाही, तर सर्व व्यर्थच!
मूळ संकल्पना समजून अभ्यास करावा
By admin | Updated: July 17, 2014 00:15 IST