शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

जिल्ह्यातील पशुधनात घट

By admin | Updated: October 22, 2014 23:23 IST

पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. जनावरांच्या चारा-पाण्याची भेडसावणारी समस्या

वर्धा : पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. जनावरांच्या चारा-पाण्याची भेडसावणारी समस्या जनावरांच्या घटीला कारणीभूत ठरत आहे. यामुळे शेतकरी, शेतमजुरांनी जनावरे मिळेल त्या भावात विक्रीचा सपाटा सुरू केल्याने गावरानी जनावरे कमी होत आहे. याचा परिणाम दुग्ध वुअवसायावरही होत आहे. भारत देश कृषिप्रधान आहे. त्यामुळेच देशातील ९० टक्के जनता आजही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. पूर्वी शेतीच्या मशागतीसाठी शेतकरी बैलांचा वापर करायचे. परिणामी शेतकऱ्यांचा जिवा-भावाचा सखा म्हणून बैलांची ओळख होती. या बैलांना जन्म देणारी गाय ‘गोमाता’ म्हणून ओळखली जाते. आता आधुनिक काळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे यांत्रिक शेतीकडे शेतकरी वळत आहेत. सोबतच आता औताच्या सहाय्याने शेती करण्यासाठी ‘सालगडी’ मिळणे दुरापास्त झाले आहे. सालगड्यांचे वार्षिक वेतन दीड ते दोन लाखांवर पोहोचले आहे. परिणामी औताने शेती करणे शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे. त्यामुळे बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.पूर्वी शेतकऱ्यांची ओळखही किती ‘औताचा’ शेतकरी म्हणून होत होती. ज्या शेतकऱ्याजवळ जितके जास्त औत, तितका त्या शेतकऱ्यांचा दर्जा मोठा होता. तेच औत ओढण्यासाठी त्यांना बैलांची गरज होती. त्यामुळे पूर्वी शेतकऱ्यांच्या अंगणात बैलांची ‘दावण’ दिसणे, हे त्यांच्यासाठी भूषणावह होते. तथापि आता बैलांच्या जोड्या निर्माण करणाऱ्या गोमाताच नष्ट होत आहे.विदर्भातील गावरानी बैल कष्टाळू बैल म्हणून ओळखले जातात. त्यांना पूर्वी अधिक मागणी होती. शेतकरी कधी काळी बैल व पाळीव जनावरांसाठी शेतात कुरण राखून ठेवायचे. आता कुरणेही नष्ट होत आहेत. पूर्वी शेतकरी म्हटला की, त्यांच्याकडे गायी, म्हशी पाळल्या जात होत्या. जनावरांपासून मिळणारे दूध, दही, लोणी, तूप शेतकऱ्यांच्या घरीच बनविले जात होते. एवढेच नव्हे तर सालदारांनाही त्याचे वाटप केले जात होते. त्यामुळे ग्रामीण भागात दूध-दुभते राहात होते. यापूर्वी शेतकऱ्यांसोबतच ग्रामीण भागातील शेतमजूर एखादी म्हैस किंवा गाय नाही, तर किमान एखादी बकरी तरी पाळत होते. त्यामुळे पूर्वी ग्रामीण भागात दुधाची धवलक्रांती होती. लग्नकार्यप्रसंगी लागणारे दूध, दही गावातच मिळत होते. सोबतच या पाळीव जनावरांच्या विष्ठेपासून उत्तम प्रकारचे शेणखत तयार होत होते. परिणामी शेतीचा ‘पोत’ ही सुधारत होता. रासायनिक खताची गरजही पडत नव्हती. प्रत्येक गावात दोन-चार गुराखी जनावरांचे कळप जंगलात चारायला नेत होते. आता जंगले नष्ट होऊ लागल्याने जनावरांना चारा मिळणे कठीण झाले आहे. उन्हाळ्यात नदी, नाले आटत असल्याने जनावरांना पिण्यासाठी व धुण्यासाठी पाणीही मिळत नाही. उन्हाळाभर म्हशींचे कळप नदी नाल्यात बसून दिसायचे, तेही दिसेनासे झाले आहे. जिल्ह्यातील चारा-पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी, मजुरांनी गेल्या १० वर्षात पाळीव जनावरे विकण्याचा सपाटाच सुरू केला. विक्रीस काढलेली जनावरे घेण्यास पुन्हा दुसरे शेतकरी व शेतमजूर उत्सुक नसतात. त्यामुळे आता दुधाळ व धष्टपुष्ट जनावरेसुध्दा दुसऱ्यालाच विकावी लागतात. परिणामी कत्तलखाने आता दुधाळ जनावरांनी भरलेले दिसतात. त्यामुळे ग्रामीण भागात दुग्ध उत्पादन कमी झाले आहे. पिशवीचे दुध विकत घेण्याची वेळ खुद्द शेतकऱ्यांवरच ओढवली आहे.(शहर प्रतिनिधी)