शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

वर्धेत आयपीएलवर सट्टा

By admin | Updated: April 24, 2015 23:55 IST

सध्या आयपीएलचा ज्वर जोर धरत आहे. यात गुरुवारी रात्री सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स व दिल्ली डेअरडेव्हील्स या दोन संघातील...

एकास अटक; एक फरार : सिव्हील लाईन परिसरात कारवाईवर्धा : सध्या आयपीएलचा ज्वर जोर धरत आहे. यात गुरुवारी रात्री सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स व दिल्ली डेअरडेव्हील्स या दोन संघातील सामन्यावर सिव्हील लाईन्स परिसरात सट्टा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी कारवाई केली. यात एकाला अटक करण्यात आली तर एक फरार झाला. या कारवाईत पोलिसांनी एकूण ७५ हजार ३१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्याचे नाव सुभाष जैन तर फारार झालेल्याचे नाव अंकुर जैन असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, सुभाष जैन व त्यांचा मुलगा अंकुर हे दोघे मिळून त्याच्या घरी या सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स व दिल्ली डेअरडेव्हील्स या सामन्यावर पैशाची बाजी लावत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रेड केला असता अंकुर जैन हा मौक्यावरून फरार झाला. त्याच्या घर झडतीमध्ये वरच्या माळ्यावर दोन टिव्ही संच (एलईडी), दोन टिव्ही रिमोट, एक लॅपटॉप, एक पेनड्राईव्ह, दोन एक्सटेंशन बोर्ड, दोन मोबाईल हॅन्डसेट, तीन मोबाईल चार्जर, एक लॅन्डलाईन फोन, एक क्लिप बोर्ड, एक पेन, एक बजाज कपंनीचा कुलर, एक डिव्हीआर मशिन, लगवाडीचे आकडे लिहून असलेला कागद व रोख ७ हजार ९०० रुपये, असा एकूण ७५ हजार ३१५ रुपयांचा माल जप्त केला. यात सुभाष जैन याला अटक करण्यात आली. या दोघांविरूद्ध शहर ठाण्यात मुंबई जुगार कायद्याच्या कलम ४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई एसपी अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश चाटे व पोलीस कर्मचारी उदसिंग बारवाल, अशोक वाट, दिवाकर परिमल, अमर लाखे, आनंद भस्मे, समीर कडके, संजय गायकवाड, किशोर अप्तुलकर, संजय देवरकर, विलास बालपांडे, संचाली मुंगुले, शिल्पा राऊत, अजय वानखेडे, दिनेश बोथकर, अक्षय राऊत, अनुप कावळे यांनी केली. (प्रतिनिधी)