हिंगणघाट: महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत असणाऱ्या विभागांमध्ये महसूल विभाग हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. शासनाची प्रशासनात्मक कामे या विभागामार्फतच केली जातात. त्यामुळे या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते खालच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण असतो. हा कामाचा ताण कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला स्थानिक संत कंवरराम भवन हिंगणघाट येथे हा मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. हिंगणघाटचे तहसीलदार दीपक करंडे यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन द्विस्तरीय पद्धतीने केले. तलाठी साझांतर्गत वृक्षरोपण, सातबारा वितरण, विविध प्रमाणपत्राचे वाटप तसेच सत्कार कार्यक्रमही यावेळी घेण्यात आला. कोतवाल, शिपाई, कनिष्ठ व वरिष्ठ लिपीक, तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तसहीलदार, उपविभागीय अधिकारी जी. एच. भूगावकर म आदींची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमांतर्गत ३३५ सातबारा, ४५ आठ-अ, १७१ नकाशे ६७५ रहिवासी दाखले, १८० उत्पन्नाचे दाखले, इतर दाखले ३१९ आदीचे वाटपही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय काटपातळ यांनी केले. कार्यक्रमाचा उद्देश व कार्यक्रमाची पार्श्वभूमी तहसीलदारांनी सुरुवातीला स्पष्ट केली. यानंतर कर्मचारी वर्गाने कामाच्या व्यापातही योग्य काम आणि नागरिकांशी सुसंवाद कसा साधावा यावर मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच ताणाचे व्यवस्थापन कसे करावे यावरही मार्गदर्शन करण्यात आले.उपविभागीय अधिकाऱ्यांच्या ज्ञानेश्वर हुलके, प्रकाश निमडकार, नरेश कुडमेथे, वैरागडे कोतवाल, प्रमोद पांडे दिनेश मंडलवार, जांभुळकर, पी.एस. डेहणे, डी.एस. कापकर, एस. डब्ल्यू, अंबादे, आर. पी. घवघवे, आर.एम. दाते, जी. बी. नकोरिया, अरूण सुरजुसे, एस.आर. भोंग, गणेश तमगिरे व मंडळ अधिकारी, आर.बी. चकोले नायब तहसीलदार, यु. आर राठोड व जे.व्ही. बोरीकर, गजानन टेकाडे पुरवठा निरीक्षक व स्वस्त धान्य दुकानदार मोहन ढेकरे, विनोद ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर जोत्स्रा भगत, रंजना भोमले आणि एस.के. चंदनखेडे यांना पुरस्कृत करण्यात आले. कार्यक्र माचे संचालन दिलीप कावळे यांनी केले. आभार नायब तहसीलदार यु. आर. राठोड यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व सत्कार कार्यक्रम
By admin | Updated: August 9, 2014 01:45 IST