शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

ब्रिटिशांच्या बंधनातून पुलगाव-आर्वी शकुंतला मुक्त करा

By admin | Updated: August 27, 2016 00:31 IST

जिल्ह्याची ओळख असलेली इंग्रजकालीन नॅरोगेज रेल्वे म्हणजेच जिवाभावाची शकुंतला स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही बिटीशांची गाडी म्हणून ओलखली जात आहे.

रामदास तडस : आमला स्टेशनपर्यंत मार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी लोकसभेत शून्य प्रहरात मागणीपुलगाव : जिल्ह्याची ओळख असलेली इंग्रजकालीन नॅरोगेज रेल्वे म्हणजेच जिवाभावाची शकुंतला स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही बिटीशांची गाडी म्हणून ओलखली जात आहे. काही वर्षांपूर्वी ती बंदही करण्यात आली. त्यामुळे ब्रिटिशांच्या बंधनातून पुलगाव आर्वी शकुंतला रेल्वे मुक्त करून ती ब्रॉडगेज करा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी शून्य प्रहारात लोकसभेत केली.व्यापाराच्या दृष्टीकोनातून इंग्रज भारतात आले आणि राज्यकर्ते होऊन बसले. जिल्ह्यात कवठा येथे त्यांचे मुख्यालय होते. येथूनच त्यांचा व्यापार चालत असे. सर्व भौगोलिक सुविधा व वऱ्हाडातील कापसाचे मोठ्या प्रमाणात होणारे उत्पादन, बाजारपेठ परिसरात चालणारा दूध दही व लोण्याचा व्यापार, आष्टी-वरूड भागातील उत्पादन या सर्व बाबीचा व्यावसायिक दृष्टीने विचार करून हावडा-मुंबई या रेल्वे मार्गावर वर्धा नदीवर पुलाचे बांधकाम करून ब्रीज टाऊन पुलगाव शहराची निर्मिती करून ब्रिटिशांनी केली. या परिसराचे महत्व लक्षात घेत पुलगाव-आर्वी हा नॅरोगेज रेल्वेमार्ग शतकापूर्वी सुरू करून परिसरातील जनतेसाठी दळणवळणाचे नवीन दालन सुरू केले होते. देश १९४७ साली स्वातंत्र्य झाला. परंतु ही शकुंतला २०१६ पर्यंत ब्रिटीशांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे ब्रिटीशांच्या बंधनातून पुलगाव-आर्वी शकुंतला मुक्त करून आमला स्टेशन पर्यंत तिचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करा, अशी मागणी वर्धा लोकसभा क्षेत्राचे खा. रामदास तडस यांना शून्य प्रहारात लोकसभेत केली.शतकापूर्वी सुरू करण्यात आलेली ही पुलगाव आर्वी शकुंतला दशकापूर्वी तत्कालीन केंद्र शासनाने बंद केली. पूर्वी दळणवळणाचे कुठलेही साधन नसताना ५ आण्यात आर्वीचा प्रवास होत असे. पुलगाव-आर्वी दरम्यान येणाऱ्या ग्रामीण भागातील दळणवळणाचे एकमात्र साधन असलेली ही शकुंतला दिवसातून तीनदा धावत होती. त्यामुळे या दोन शहरादरम्यान दुग्धव्यवसाय करणारे गोपाल, नोकरीसाठी शहरात येणारे कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी यांचे आवागमन चालत असे. प्रवासी गाडीच्या व्यतिरिक्त पुलगाव-आर्वी दरम्यान व्यावसायिक दृष्ट्या मालगाडी देखील धावत होती. ही रेल्वे ब्रिटीश कंपनीच्या ताब्यात असल्यामुळे दर दहा वर्षानी या रेल्वेचा भारतीय रेल्वे व ब्रिटीश कंपनीमध्ये करार व्हायचा. शेवटचा करार २००६ मध्ये होवून २०१६ पर्यंत राहणार आहे.पुलगाव शहरात १८८९ साली पुलगाव कॉटन मील या मोठ्या वस्त्रोद्योगाची सुरूवात झाली. केंद्रीय दारूगोळा भांडारही स्थापन झाले. हेच महत्व लक्षात घेत पुलगाव-आर्वी नॅरोगेज रेल्वेगाडी सुरू करून पुलगाव जंक्शन झाले. परंतु २००७ पासून ही शकुंतला बंद करून या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगे्रजमध्ये रूपांतर करून आमला या रेल्वे स्थानकापर्यंत ही रेल्वेसेवा सुरू करण्याच्या मागणीला वाटण्याच्या अक्षदा दाखविण्यात आल्या. खासदार तडस यांनी ६ आॅगस्ट २०१४ रोजी लोकसभेत रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधण्यासाठी पुलगाव-आर्वी आमला रेल्वे मार्गाच्या रूंदीकरणाचा प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान केंद्र शासनाने अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ या रेल्वे मार्गासाठी १५०० कोटी दिले. मग पुलगाव आर्वी आमला या रेल्वेमार्गासाठी भेदभाव का असा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्वी-आष्टी वरूड-पुलगाव येथील नागरिकांनी १०० कि़मी. रेल्वे मिशन समिती स्थापन करून ही मागणी लावून धरली आहे. शहरातील विविध संस्था व संघटनांचे या चळवळीला सहकार्य मिळत आहे.(तालुका प्रतिनिधी)