शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

संत्रा गारपीटग्रस्तांच्या अनुदानात अफरातफर

By admin | Updated: August 20, 2014 23:42 IST

कारंजा तालुक्यातील साझा कुंडी व ठाणेगाव येथील गारपीटग्रस्त संत्रा बागायतदारांकडून येथील तलाठी कुकडे यांनी आर्थिक व्यवहार करून अनुदानाच्या रकमेची अफरातफर केली. त्यामुळे

तलाठ्यावर कारवार्ईची करा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनंवर्धा : कारंजा तालुक्यातील साझा कुंडी व ठाणेगाव येथील गारपीटग्रस्त संत्रा बागायतदारांकडून येथील तलाठी कुकडे यांनी आर्थिक व्यवहार करून अनुदानाच्या रकमेची अफरातफर केली. त्यामुळे लाभार्थी असलेल्या खऱ्या संत्रा बागायतदारांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. याप्रकरणी तलाठी कुकडे यांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी प्रहार युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी नवीन सोना यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनानुसार, साझा कुंडी व साझा ठाणेगाव येथे कार्यरत असलेले तलाठी कुकडे यांनी संत्रा बागायतदार शेतकऱ्यांंना सन २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये मिळालेल्या गारपीट अनुदानाच्या रकमेमध्ये आर्थिक गैरव्यवहार केला. २०१२-१३ च्या संत्रा बागायत अनुदानाची रक्कम कुकडे यांनी येथील एका पं. स. सदस्याचे वडील जानराव पांडूरंग उकंडे यांच्या नावाने जमा केली. वास्तवात मात्र जानराव उकंडे यांच्या मौजा कुंडी येथील शेत नं. २९९ मध्ये कुठल्याही प्रकारची संत्रा बाग नाही. सदर शेतामध्ये खरीप हंगामाचे पीक घेतल्या जाते. तरी सुद्धा तलाठी कुकडे यांनी उकंडे यांच्या शेत नं. २९९ मधील आराजी ०.४० हे.आर. मध्ये संत्रा बागायत दाखवून अनुदानाची रक्कम त्यांना मिळवून दिली आहे.२०१३-१४ मध्येही गारपीटग्रस्त संत्रा बागायतदारांना अनुदान देण्यात आले. यातही तलाठी कुकडे यांनी जानराव उकंडे यांची ०.२० हे. आर मधील जमीन संत्रा गारपीटग्रस्त दाखवून १८,५०० रुपये अनुदानाची रक्कम त्यांना मिळवून दिली. अशाच प्रकारचे अनुदान या तलाठ्याने इतरांनाही मिळवून दिल्याचे निवेदनात नमूद आले. जनार्दन रामचंद्र शेंदरे व इतर चौघांच्या नावाने असलेल्या शेत नं.६६ या शेतातील शेत नं. ३७/१ मध्ये आराजी ०.३६ हे. आर.मध्ये संत्रा बागायत दाखवून २१ हजाराच्या अनुदानाची अफरातफर केली. परंतु सदर शेत स.नं. ३७/१ हे कलावतीबाई जनार्दन शेंदरे यांच्या नावे आहे. त्यांना सुद्धा आराजी ०.१५ हे. आर. मध्ये संत्रा बागायत दाखवून ३ हजार ७५० रुपयांचे अनुदान मिळवून दिले आहे. गुणवंत यादवराव भक्ते यांच्या नावे शेत नं. २३ असून त्यांनीही शेतात संत्राची लागवड केली आहे. सदर संत्रा झाडांचे वय केवळ २ वर्षाचे आहे. तरीसुद्धा सदर तलाठ्याने आराजी ०.१५ हे.आर. मध्ये संत्र्याचे नुकसान दाखवून ९ हजाराचे अनुदान लाटले. अशाप्रकारे तलाठी कुकडे यांनी सन २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये गारपीट अनुदान वाटपाच्या रकमेमध्ये आर्थिक व्यवहार करून खोट्या संत्रा बागायदतारांना संत्रा गारपीट नुकसानाचे अनुदान वाटप केलेले आहे. यामुळे खरे नुकसानग्रस्त संत्रा बागायतदार गारपिटीच्या अनुदानापासून वंचित राहिले. या प्रकारामुळे ज्यांच्या संत्र्यांचे गारपिटीमुळे नुकसान झाले त्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे तलाठी कुकडे यांची तातडीने कार्यालयीन चौकशी करावी आणि त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी प्रहार युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी सोना यांना निवेदनाद्वारे केली आहे.(शहर प्रतिनिधी)