शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

नाणी प्रदर्शनातून उलगडले चलनाचे गतकालीन वैभव

By admin | Updated: February 28, 2016 02:13 IST

प्राचीन इतिहास, संस्कृती व चलन प्रणीलीची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हावी, तरुण पिढीला छंद जोपासून प्राचीन वस्तूंचा ठेवा टिकवून ठेवण्यासाठी ...

ऐतिहासिक वारसा : इतिहासाचा अभ्यास, राज्याची स्थाने, नावेम क्रमवारी कळण्यास मदतरोहणा : प्राचीन इतिहास, संस्कृती व चलन प्रणीलीची माहिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्हावी, तरुण पिढीला छंद जोपासून प्राचीन वस्तूंचा ठेवा टिकवून ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने एकदिवसीय नाणे प्रदर्शनाचे आयोजन स्थानिक वसंतराव कोल्हटकर कला महाविद्यालयातील इतिहास विभागाद्वारे करण्यात आले होते. या प्रदर्शनातून चलनाचे गतकालीन वैभव पहावयास मिळालेनाणे प्रदर्शनाचे उद्घाटन नारायणराव काळे स्मृती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कारंजा घाडगेच्या इतिहास विभागप्रमुख प्रा. वंदना तागडे यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नितीन माथनकर, तर प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्रसिंह ऊर्फ बाबा व्यास कला महाविद्यालय कोंढाळीचे प्रा. डॉ. गोपीचंद कठाणे उपस्थित होते. इतिहासाचा अभ्यास करताना महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या साधनांमध्ये त्या-त्या काळातील नाण्यांचा समावेश होतो. व्यापार आर्थिक विनिमय, सुबत्ता, अवनती, तंत्रज्ञानात्मक प्रगती, राजकीय यंत्रणा, तत्वज्ञान, धार्मिक कल्पना, कला कुसर इत्यादी पैलूंविषयी ऐतिहासिक नाणी बोलू शकतात. नाण्यामुळे रोजचा काळ, राज्याची स्थाने, त्यांची नावे, यांची क्रमवारी, त्यांच्या सीमा कळण्यास मदत होते. नाण्याचे वजन, आकार, प्रकार, धातू, नाण्यांकरिता मजकूर, चित्रे, चिन्हे, नाण्यांचे दर्शनी मुल्य, त्याची टाकसाळ आदी गोष्टी महत्त्वाच्या असतात असे प्रा. तागडे यांनी प्रतिपादित केले. नाणी प्रदर्शनात इ. स. १८३५ ते २०१० पर्यंतची दुर्मीळ नाणी होती. वैदिक काळात दीड क्विंटल धान्याच्या मोबदल्यात एक गाय आणि वासरु दिले जायचे. प्रदर्शनात गाय, वासरू असलेली पितळाची प्रतिमा ठेवलेली होती. इ. स. पूर्व सहाव्या शतकात नाण्याचा शोध लागला. त्यानंतरच्या आंत्र्यशाहीतील पाचव्या आणि सहाव्या राजा जॉजर्च चित्र असलेले तांब्याचे गोलाकार, हॉफ क्वार्टर एक आणि दोन पैसे ठेवलेले होते. कमळ चिन्ह असलेले १९६९ चे पितळीचे २० पैशांचे नाणेही ठेवले होते.संसद, स्वतंत्रता आंदोलनाची ५० वर्षे, पंडीत नेहरू यांच्या चित्रांचे पितळीचे ५० पैशाचे नाणे, जयप्रकाश नारायण, सेल्युलर जेल, पंडीत नेहरू यांच्या चित्रांचे एक रुपयाचे नाणे, सरदार पटेल, श्री. अरविंद, छत्रपती शिवाजी, लूई ब्रेल, संत तुकाराम, देशबंधु चित्तरंजनदास, सुभाषचंद्र बोस, राजा जॉर्ज, संत तिरुवलूर यांच्या चित्रांची नाणी, महात्मा गांधी, पंडीत नेहरु, इंदिरा गांधी, अल्फोसो, कुका आंदोलन, रवींद्रनाथ टागोर, भगवान महावीर, राणी व्हिक्टोरिया चाणक्य, वैष्णोदेवी, दाराभाई नौरोजी, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या चित्रांचे नाणे, शिवरायांच्या राजमुद्रेचा मजकूर असलेली तांब्याची अंगठी, शिवाजी व तुळजाभवानी चित्राचे पदक या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. पुणे व वाकगाव येथील टाकसाळीच्या नाण्याचे १०३० ते १२४३ पर्यंतचे चित्र, छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी कालीन शिवराई व शंभुराई, चौथ्या विल्यमचा रुपया, मुंबई, अहमदाबाद सहारणपूर, कुचबिहार व लाहोरचे नाणेचित्र विविध पोस्टल स्टॅम्पची चित्रे या प्रदर्शनात होती. प्रास्ताविक व नाणे संकलक प्रा. डॉ. तीर्थनंदन बन्नगरे यांनी केले. संचालन देवयानी मुडे तर आभार जयश्री चितळकर हिने मानले.(वार्ताहर)