समुद्रपूर : २१ मे २०१४ हा दिवस संपूर्ण राज्यात दहशतवाद हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. सर्व शासकीय कार्यालये व सार्वजनिक संस्थांमध्ये दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. राज्यपाल यांच्या आदेशानुसार उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी १२ मे २०१४ ला काढलेल्या परिपत्रकानुसार दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस पाळण्याबाबतचे दिशानिर्देश दिले आहेत. केन्द्रीय गृह मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांच्याकडून २१ मे हा दिवस दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येतो. त्याच धर्तीवर राज्यात हा दिवस पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा दिवस विविध शाळा महाविद्यालय पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहे. विविध शाळा महाविद्यालय वृत्तपत्रे, मासिके तसेच स्वयंसेवी - सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून दहशतवाद व हिंसाचाराबाबत समाजामध्ये जाणीव करण्यात येणार असून शासकीय कार्यालये व सार्वजनिक संस्थांमधून प्रतिज्ञा घेतली जाणार आहे.(शहर प्रतिनिधी)
सर्वजण घेणार दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा
By admin | Updated: May 20, 2014 23:48 IST