शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

शहरात पाणपक्ष्यांचा अधिवास धोक्यात

By admin | Updated: April 24, 2015 23:54 IST

शहरातील हुनमान टेकडी परिसरात असलेल्या आयटीआय टेकडी परिसरात असलेल्या तलावातील कमळपुष्प व पाणवनस्पीमुळे तो पाणपक्ष्यांच्या अधिवासाकरिता योग्य ठरला आहे.

संबंधीत विभागाचे दुर्लक्ष : आयटीआय टेकडी परिसरातील होणारे बांधकाम अडचणीचे वर्धा : शहरातील हुनमान टेकडी परिसरात असलेल्या आयटीआय टेकडी परिसरात असलेल्या तलावातील कमळपुष्प व पाणवनस्पीमुळे तो पाणपक्ष्यांच्या अधिवासाकरिता योग्य ठरला आहे. येथे होत असलेल्या बांधकामामुळे या तलावाचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. शिवाय या तलाव परिसरात पसरत असलेल्या अस्वच्छतेचाही या पक्षांना त्रास होत असल्याचे समोर येत आहे. तलाव परिसरात परपल स्वॅपहेन, कॉमन मूरहेन, परपल हॅरोन, व्हाईट ब्रेस्टेड वॉटरहेन, व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर, स्मॉल ब्लू किंगफिशर, कारमोरंट, पाँड हेरोन तथा लिटील व कॅटल इग्रेटस या सारखे अनेक पाणपक्षी नियमित आढळून आले आहेत. कॉमन हुरहेन, परपल स्वॅम्पहेन व वॉटरहेनची नेस्टींग साईड असून पक्षी निरीक्षकांना पिलांसहित हे पक्षी आढळून आलेले आहेत. शिवाय सफोज वुडपिकर (उदी सुतार) हा क्वचित आढळणाऱ्या पक्ष्यांची नोंद देखील या परिसरात पक्षी मित्रांनी केली आहे.तलाव असलेल्या परिसरात शासकीय वसतीगृहाच्या बांधकामास प्रारंभ झालेला आहे. हा भाग तलावाला लागून येतो. शिवाय ले-आऊट करीता टेकडीचे अक्षरश: सपाटीकरण करणे सुरू आहे. कुणीही यावे आणि कचरा टाकून जावे या प्रकारामुळे या परिसरात जागोजागी प्लास्टिक कचऱ्याचे ढिग दिसतात. त्यामुळे सकाळी येथे फिरण्याकरिता येणाऱ्यांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. या सर्व प्रकाराला थांबवण्यासाठी संबंधित विभागांची कुठलीही हालचाल दिसत नाही. आता जनप्रतिनिधींच या विषयी पुढाकार घ्यावा, असी अपेक्षा पक्षी अभ्यासक करीत आहे. पाणपक्ष्यांचे महत्त्व लक्षात घेऊन हा अधिवास वाचवावा तसेच या तलावाचे खोलीकरण करून सुरक्षेसाठी कुंपन व सौंदर्यीकरण करण्यात यावे, तसेच गैरप्रकार थांबविण्यासाठी त्वरीत कार्यवाही व्हावी, अशी मागणी वर्धेतील पक्षीमित्र व पक्षी अभ्यासक दिलीप विरखडे, किशोर वानखेडे, राहुल तेलरांधे, संजय इंगळे तिगावकर, घनश्याम माहुरे, पराग दांडगे, रमेश बाकडे, दीपक गुढेकर, प्रभाकर पुसदकर, सुभाष मुढे, जयंत सबाने, रवींद्र पाटील, डॉ. बाबाजी घेवडे, कौस्तुब गावंडे, मनोहर लटारे, पार्थ वीरखडे यांच्यासह अनेकांनी केली आहे.(प्रतिनिधी)