जिल्ह्यातील १५० पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभागवर्धा : येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांची उपस्थिती होती. ही स्पर्धा तीन दिवस रंगणार आहे. सन २०१४ चे उत्कृष्ट खेळाडू प्रकाश चौधरी व सुनैना डोंगरे यांनी क्रीडा ज्योत मशाल ग्राऊंडमध्ये फिरवून सदर मशालीने मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत केली. कार्यक्रमाचे पथसंचालन राखीव पोलीस उपनिरीक्षक एम.एस. ठवरे यांनी केले. पथसंचालनकरिता मुख्यालय व जिल्ह्यातील चारही उपविभागातील एकूण १५० खेळाडूंनी भाग घेत मान्यवरांना मानवंदना दिली. राखीव पोलीस निरीक्षक आर.एस. चारथळ व क्रीडा प्रशिक्षक राजू उमरे यांनी कार्यक्रमाची सुत्रे सांभाळली. यावेळी पुलगावचे एसडीपीओ राजन पाली, हिंगणघाटचे डब्ल्यु सूर्यवंशी, आर्वीचे कानडे यांच्यासह बी.काळे, एम. चाटे, एम. बुराडे, व अधिकारी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन डॉ. अजय येते यांनी केले. यावेळी पोलीस विभागाचे सर्वच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेला प्रारंभ
By admin | Updated: August 10, 2015 01:40 IST