भास्कर कलोडे हिंगणघाटयेथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारातील दोन कोल्ड कॅबीनेट गत दोन महिन्यांपासून बंद आहे. यामुळे शव विच्छेदनापर्यंत मृतदेह ठेवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महामार्गावर असलेल्या या रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. येथील शवगृहात एकावेळी किमान पाच शव ठेवता यावे व इतर सुविधा देण्याकडे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग व लोहमार्गावर असलेल्या जिल्हातील मोठ्या असलेल्या या शहरात अपघाताचे प्रमाण अधिक आहे. त्याप्रमाणात येथील शवागारातील कोल्ड कॅबिनेटची संख्या कमी तर आहेच शिवाय सदर कोल्ड कॅबिनेट गत दोन वर्षांपासून सुरू असले तरी सध्या ते जीर्णावस्थेत असून गत दीड महिन्यापासून बंद आहे. ते दुरुस्ती योग्य नसल्याचे सांगण्यात येत आाहे. त्यामुळे येथे नवीन कोल्ड कॅबीनेटची गरज असली तरी ते पाच शवाचे असावे अशी नागरिकांची मागणी आहे. सदर कोल्ड कॅबीनेट बंद असल्याची घटना नुकत्याच सापडलेल्या दोन अज्ञात मृतदेहाला वर्धेत हलविण्यात येत असताना उघड झाले. या मृतकाची ओळख पटली नसल्याने सदर दोन्ही मृतदेह काही दिवस शवागारात ठेवण्याची गरज होती; परंतु येथील कोल्ड कॅबिनेट बंद असल्याने अडचण झाली.
शवागारातील कोल्ड कॅबिनेट बंदावस्थेत
By admin | Updated: July 12, 2014 01:38 IST