शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना मिळणारा गहू निकृष्ट

By admin | Updated: October 9, 2015 02:25 IST

येथील स्वस्त धान्य दुकानात निकृष्ठ दर्जाचा गहू मिळत असल्याच्या तक्रारीवरून आमदार समीर कुणावार यांनी बुधवारी ...

आमदारांकडून स्वस्त धान्य दुकानांची तपासणीहिंगणघाट : येथील स्वस्त धान्य दुकानात निकृष्ठ दर्जाचा गहू मिळत असल्याच्या तक्रारीवरून आमदार समीर कुणावार यांनी बुधवारी आकस्मिकरित्या स्वस्त धान्य दुकानामधील धान्याची तपासणी केली. याचवेळी त्यांनी शासकीय गोदामाची पाहणी केली. या गोदामात असलेला गहू निकृष्ठ असल्याचे दिसून आले. यामुळे हा गहू परत नेत चांगल्या प्रतिचा गहू देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या. आ. कुणावार यांनी राममंदिर वॉर्ड, मातामंदिर वॉर्ड, दत्त मंदिर वॉर्ड, नन्नाशा वॉर्डातील स्वस्त धान्य दुकानात जावून स्वत: तपासणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार दीपक करांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई, पुरवठा निरीक्षक टेकाडे सहभागी होते. काही ग्राहकांनी शहरातील स्वस्त धान्य दुकानात निकृष्ठ दर्जाचा गहू मिळत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी स्वत: स्वस्त धान्य दुकानातील धान्याची तपासणी करून नमुने गोळा करून घटनास्थळीच पंचनामा केला. बहुतांश दुकानात काही निकृष्ठ दर्जाच्या गव्हांची पोती आढळून आली.याबाबत दुकानमालकांना विचारणा केली असता त्यांनी शासकीय धान्य गोदामातून निकृष्ठ दर्जाचा गहू मिळत असल्याचे सांगितले. हा गहू ग्राहकांना कदापि देता कामा नये, अशी तंबीही आ. कुणावार यांनी दिली. यानंतर आमदारांनी त्यांचा मोर्चा शासकीय धान्य गोदामाकडे वळविला. तेथे त्यांनी हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यात पुरवठा होणाऱ्या गव्हाच्या पोत्याची तपासणी केली. तपासणीअंती सुमारे २० टक्के गहू हा खाण्यायोग्य नसल्याचे निदर्शनास आले. येथेही त्यांनी पंचासमक्ष पंचनामा केला. यावर तातडीने उपायोजना करण्यासाठी तहसील कार्यालयात बैठक घेतली.या बैठकीत स्वस्त धान्य दुकानामधून ग्राहकांनी निकृष्ठ दर्जाचा धान्यमाल घेवू नये, असे सूचना फलक लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. तसेच दुकानदारांनी सुद्धा निकृष्ठ दर्जाचा धान्यमाल गोदामामधून उचलू नये. उचल्यास तो परत करावा, अशाही सूचना त्यांनी केल्यात. ग्राहकांना चांगल्या प्रतीचा धान्यमाल मिळावा हा हेतू या कार्यवाही मागील असल्याचे आ. कुणावार यांनी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)खैरीच्या स्वस्त धान्य दुकानात धान्य वाटपात अनियमितताआकोली- सेलू तालुक्याच्या खैरी येथील स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना डावलले जात असून असून त्यांच्या नावावर येणारे धान्य कुठे जाते याचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.आमदार धान्य दुकानांना व शासकीय गोदामांना भेटी देणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सवाई यांना मिळाली. यावरून त्यांनी थेट हिंगणघाट गाठले. आमदारांनी गोदामातील धान्याची पाहणी करताच आलेली दुर्गंधी सवाई यांना सहन झाली नसल्याने त्यांनी नाकाला रुमाल लावल्याने सारेच विचारात पडले. ग्राहकांनी निकृष्ट धान्य घेऊ नयेपरिसरातील ग्राहकांनी निकृष्ठ दर्जाचा धान्यमाल घेवू नये, या आशयाचे फलक प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात लावण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. परिसरात खळबळ आ. कुणावर यांनी शहरातील धान्य दुकानाची अचानक तपासणी केल्याने दुकान मालकांची चांगलीच तारांबळ उडाली.