शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण पं.स. इमारतीचा कायापालट होणार काय?

By admin | Updated: March 6, 2017 01:05 IST

विद्यमान पं.स. पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ १४ मार्च रोजी संपणार आहे. नवनिर्वाचित सदस्य पं.स.चा कार्यभार सांभाळणार आहे.

नागरिकांचा सवाल : कित्येक सभापती, अधिकारी बदलले; पण दुरवस्था कायमचसेलू : विद्यमान पं.स. पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ १४ मार्च रोजी संपणार आहे. नवनिर्वाचित सदस्य पं.स.चा कार्यभार सांभाळणार आहे. या पाच वर्षांच्या काळात तरी पं.स. च्या जीर्ण इमारतीचा कायापालट होणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ७ सप्टेंबर १९६२ रोजी सेलू पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून अमृत सिताराम काटकर यांनी पदभार सांभाळला होता. तेव्हा येथे इमारत, विभागवार कार्यालये आणि कर्मचारी वसाहत होता. आज याला ५५ वर्षे होत आहेत. ५५ वर्षांच्या कालावधीत १४ व्यक्तींनी सभापतीपद भूषविले. दरम्यानच्या काळात कार्यालयाची इमारत जीर्ण झाली. कर्मचारी वसाहत तर अस्तित्वातच राहिली नाही. ज्या मुख्य इमारतीत गटविकास अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, लेखा, कृषी व पंचायत विभाग आहे, त्या इमारतीच्या छतावर बारमाही ताडपत्रीचे पांघरून घालावे लागते. पशुसंवर्धन, शिक्षण आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे कार्यालय असलेल्या इमारतीला तडे गेले आहेत. हे चित्र इमारत जीर्ण झाल्याचे सांगते.सभापती, उपसभापतीकरिता असलेला कक्ष पाहता राजकीयदृष्ट्या जिल्ह्यात दबदबा असलेल्या पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न सामान्यांना पडणे स्वाभाविक आहे. पंचायत समितीच्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या दुरूस्ती, नवीन इमारत याबाबत अनेकदा प्रस्ताव पाठविण्यात आले. येथील तहसील कार्यालयाला नवीन इमारत मिळत आहे; पण पं.स. इमारतीचे भिजत घोंगडे कायमच आहे. याबाबत शासनदरबारी पाठपुरावाही करण्यात आला; पण दाद मिळत नसल्याचेच दिसून येत आहे. आजपर्यंतच्या सभापती, अधिकारी व पदाधिकाऱ्यांना पं.स. कार्यालयासाठी नवीन इमारत मिळविता आली नाही. आता नव्याने निवडून आलेले पदाधिकारी येथील पं.स.च्या जीर्ण इमारतीचा कायापालट करून नवीन इमारतीसाठी पुढाकार घेणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)महत्त्वाची कार्यालये असलेल्या बहुतांश इमारतींची दुरवस्थासेलू हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आणि संवेदनशिल तथा राजकीय वजन असलेला तालुका मानला जातो. यामुळे येथील प्रशासकीय यंत्रणा सक्षम व सुसज्ज असावी, अशी अपेक्षा असते; पण ही अपेक्षा फोलच ठरताना दिसते. सेलू शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयांच्या इमारतींची दुरवस्था झाल्याचेच पाहावयास मिळते. पंचायत समितीच्या इमारतीला तर वारंवार डागडुजी करावी लागते. अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले असून पावसाळ्यात कार्यालयात बसणेही कठीण होते. यामुळे नवीन पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून नवीन इमारतीची अपेक्षा केली जात आहे.