पावसापासून बचाव व्हावा म्हणून सामान्य नागरिक चार चाकी वाहनांचा आधार घेतात. यातही राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला प्राधान्य दिले जाते. यामुळे परिवहन महामंडळाने बसेस सुस्थितीत ठेवणे गरजेचे असते; पण जिल्ह्यातील बसेस भंगार झाल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळते. सध्या ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या प्रत्येक बसेस भंगारावस्थेत असून असुरक्षित झाल्या आहेत. पावसापासून बचाव करण्यासाठी सामान्य प्रवासी बसद्वारे प्रवास करीत असले तरी त्यांनाही गळती लागली आहे. शिवाय बसेसची तावदाने तुटलेल्या अवस्थेत असल्याने खिडकीतूनही प्रवासी ओले होते. यात सुधारणा करण्याची अपेक्षा प्रवासी व्यक्त करताहेत. वर्धा-समुद्रपूरसाठी सज्ज असलेली खिडक्या नसलेली बस.
पावसाळ्यातही बसेसची लक्तरेच...
By admin | Updated: August 13, 2015 02:50 IST