शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

सायकल जंगलभ्रमंतीने वेधले जिल्हावासीयांचे लक्ष

By admin | Updated: August 10, 2015 01:42 IST

बहार नेचर फाउंडेशनच्या सायकल जंगल भ्रमंतीच्या सदस्यांनी १२० किलोमीटरची सायकल परिक्रमा करीत संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष वेधले.

वर्धा : बहार नेचर फाउंडेशनच्या सायकल जंगल भ्रमंतीच्या सदस्यांनी १२० किलोमीटरची सायकल परिक्रमा करीत संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष वेधले. वन्यजीव आणि पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या या निसर्गप्रेमी सायकलस्वारांना नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायकल भ्रमंती यात्रेचा आरंभ सामाजिक वनीकरण उपसंचालक बी.एच. बडगे व हिंगणघाटचे लागवड अधिकारी अरविंद सरदार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पहिल्या दिवशी सायकलस्वारांनी खरांगणा येथील वनविभागाच्या कार्यालयाला भेट देत आपली भूमिका मांडली. त्यानंतर महाकाळी येथे भोजन व विश्रांती घेत सायकलस्वार मासोद या गावी रवाना झाले.मासोद येथील तलावावर या चमूने पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतला. तसेच गावकऱ्यांशी संवादही साधला. रात्री झालेली परस्पर परिचयाची मैफल आणि काव्य-गायनाची बैठक दिवसभराचा थकवा घालविणारी होती.दुसऱ्या दिवशी सकाळी सायकलस्वारांची वाटचाल ढगा भुवनाकडे सुरू झाली. दुतर्फा असणाऱ्या वनराईचा आनंद घेत आणि वाटसरुंशी संवाद साधत ढगा येथील निसर्गरम्य परिसरात ही निसर्ग जागर यात्रा दाखल झाली. रत्यातील आडवळणाच्या गावांना भेट देत माळेगाव ठेका येथील मदन जलाशयावर ही यात्रा काही काळाकरिता विसावली. या वाटचालीत पाण्याचा साठा असणाऱ्या काही स्थळांवर फळझाडांच्या बियांची पखरणही करण्यात आली. निसर्ग संरक्षण आणि संवर्धनाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करीत बोरखेडीे, जामनी मार्गे बहारची सायकल चमू वर्ध्यात परत आली. यावेळी समारोपाच्या सत्राला उपस्थित राहून सामाजिक वनीकरण उपसंचालक बी.एच. बडगे यांनी संपूर्ण चमूचे स्वागत केले. या सायकल परिक्रमेत बहार नेचर फाऊंडेशनचे किशोर वानखडे, रवींद्र पाटील, दिलीप वीरखडे, दीपक गुढेकर, डॉ. बाबाजी घेवडे, जयंत सबाने, वैभव देशमुख, प्रा. मोहन गुजरकर, आशिष गोलाईत, निखील खोडे, आशिष नाखले, विशाल बाळसराफ, दर्शन दुधाने, सुपर्ण देशमुख, ललित खोडे हे सायकलस्वार सहभागी झाले होते.नियोजन पथकात संजय इंगळे तिगावकर, रमेश बाकडे, राहुल तेलरांधे, स्रेहल कुबडे यांचा सहभाग होता. सुरक्षा पथकात पराग दांडगे, डॉ. जयंत वाघ, डॉ. सुप्रिया गोमासे, सारिका मून, नम्रता सबाने यांनी योगदान दिले. या उपक्रमाला किशोर माथनकर, जिल्हा उपवनसंरक्षक मुकेश गणात्रा, खरांगण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन बोबडे, तळेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव टाले, दिनकर पाटील, ईश्वर आदींनी सहकार्य केले. परिसरातील नागरिकांसाठीही ही सायकल भ्रमंती नाविण्यपूर्ण होती.(शहर प्रतिनिधी)