शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

४७ शेतकऱ्यांचे बयाण नोंदविले

By admin | Updated: August 13, 2015 02:45 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदी (रेल्वे) च्या बेदरकारपणामुळे येथील श्रीकृष्ण जिनिंग आणि प्रेसिंगच्या मालकाने परिसरातील शेकडो कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा ८ ते १० कोटींचा गंडा घातला.

कापूस चुकारा प्रकरण : तक्रारींना वारंवार वाटाण्याच्या अक्षतासेलू : कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदी (रेल्वे) च्या बेदरकारपणामुळे येथील श्रीकृष्ण जिनिंग आणि प्रेसिंगच्या मालकाने परिसरातील शेकडो कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा ८ ते १० कोटींचा गंडा घातला. याप्रकरणी बुधवारी बाजार समिती, उपबाजार पेठ सेलू येथील कार्यालयात लवाद अंतर्गत ४७ शेतकऱ्यांचे बयाण नोंदविण्यात आले.पैसे बुडविण्यासाठी बाजार समिती पुरेपूर जबाबदार असून दोघांच्या संगनमतानेच आम्हाला व्यापाऱ्याने गंडा घातला, असा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. शासनाने संबंधितांवर फौजदारी गुन्हे कायम करावे व कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आमचे बुडालेले पैसे वसूल करून ते परत मिळवून द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. बुधवारी लवाद अंतर्गत ४७ शेतकऱ्यांचे बयाण न्यायाधिकरण अधिकारी तथा सहायक निबंधक सहकारी संस्था, समुद्रपूरच्या आर.व्ही. निनावे यांच्या समक्ष घेण्यात आले. यावेळी सर्व शेतकऱ्यांजवळील काटापट्टी व सौदापट्टी तपासून पाहण्यात आल्या. तक्रारकर्त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शासन शेतकऱ्यांना मदत करण्यात अपयशी ठरत आहे. परंतु कमीत कमी आमच्या कष्टाचे पैसे तरी मिळवून देण्यास हातभार लावावा अशी मागणी सदर शेतकरी करीत आहे. यापूर्वी फसगत झालेल्या काही शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदी येथे लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. पण दखल घेण्याऐवजी त्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखविण्यात आल्याचा आरोप मुकुंद खोडे यांच्यासह शेतकऱ्यांकडून केला जात आहे.(शहर प्रतिनिधी)