देवळीत एकच अर्ज : सहा पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी वर्धा : नगराध्यक्षांना वाढीव कालावधी देण्याचा निर्णय रद्द होताच जिल्ह्यात नगराध्यक्षपदाकरिता इच्छुकांनी फिल्डींग लावणे सुरू केले. नगराध्यक्षाच्या निवडीकरिता गुरुवारी अर्ज दाखल करावयाचे होते. यानुसार गुरुवारी जिल्ह्यातील सहाही पालिकांकरिता एकूण २० नामांकन दाखल झाले. यात सर्वाधिक सहा अर्ज हिंगणघाट पालिकेत दाखल झाले तर देवळी पालिकेत भाजपच्या शोभा तडस यांचा एकच एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची अविरोध निश्चित मानली जात आहे.विधानसभेच्या तोंडावर होत असलेल्या या निवडणुकीत आपलीच सत्ता राहावी, याकरिता सारेच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. जिल्ह्यातील सहाही पालिकांच्या नगराध्यक्षाची निवडणूक २२ जुलै रोजी होणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणानुसार सदस्यांनी आपणही नगराध्यक्ष होवू शकतो असे म्हणत तयारी सुरू केली तर काही अपक्षांनीही नगराध्यक्षपदाची अपेक्षा ठेवत अर्ज सादर केला. वर्धा पालिकेचे नराध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गाकरिता राखीव असून तीन अर्ज सादर केले आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व बसप सदस्यांनी आपली उमेदवारी दाखल केली. सिंदी (रेल्वे) पालिकेत नामाप्र महिलेकरिता नगराध्यक्षपद राखीव असल्याने येथे महिलींची गर्दी आहे. येथे चार अर्ज सादर करण्यात आले आहे. यातील तीन अर्ज काँग्रेसचे असून एकाच उमेदवाराने दोन अर्ज तर एक अर्ज भाजपकडून सादर करण्यात आला आहे. पुलगाव पालिकेचे नगराध्यक्षपद नागरिकांच्या इतर मागास म्हणजेच ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. या पालिकेत नगराध्यक्षपदाकरिता जिल्ह्यात सर्वाधिक सहा अर्ज सादर झाले आहेत. यात काँग्रेसच्या तीन सदस्यांनी अर्ज सादर केले तर भाजपकडून एक व दोन अपक्षांनी उमेदवारी दाखल केली आहे. पुलगाव प्रमाणे हिंगणघाट येथेही नगराध्यक्षपद नागरिकांच्या इतर मागास म्हणजेच ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. येथे पाच सदस्यांनी उमेदवारी दाखल केली आहे. एक अपक्ष तर चार राष्ट्रवादीच्या सदस्यांचा समावेश आहे. देवळी येथील नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेकरिता राखीव असल्यामुळे येथे केवळ एकच अर्ज सादर करण्यात आला आहे. आर्वी येथील नगराध्यक्षपद हे खुला प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. येथे असलेल्या राजकीय समीकरणामुळे ही निवडणूक महत्त्वाची मानल्या जात आहे. आवीज्ञत आजी-माजी आमदार समोरासमोर असलेल्या या पालिकेत दोघांनीच उमेदवारी दाखल केली असून एक भाजपचा व दुसरा काँग्रेसचा आहे. यामुळे येथील निवडणूक अतीतटीची होणार असल्याचे बोलले जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
२० नामांकन दाखल
By admin | Updated: July 18, 2014 00:15 IST