शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

इकॉनॉमी क्लासमध्ये मनासारखी सीट. शक्य आहे.. त्यासाठी वापरा या 4 युक्त्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 12:41 IST

इकॉनॉमी क्लासच्या तिकीटातसुद्धा तुम्ही आरामदायी प्रवासाची संधी मिळवू शकता. अर्थात, तुम्हाला काही खास युक्त्या माहित असणं गरजेचं आहे.

ठळक मुद्दे* ‘स्कायस्कॅनर’ या ट्रॅव्हल पोर्टलनं काही विमान कंपन्यांचा डाटा एकत्रित करु न इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास यासंदर्भातली काही निरीक्षणं नोंदवली आहेत.* पुढच्या प्रवासाचं नियोजन करताना विमानात हमखास चांगली सीट मिळवण्यासाठी या निरीक्षणांचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.* जर लांब पल्ल्याचा प्रवास आरामात करायचा असेल तर चांगली सीट मिळणं गरजेचं आहे. म्हणूनच तिकिट बुक करण्याआधी थोडासा होमवर्कआणि योग्य वेळेत तुमचं बुकिंग हे खूप महत्त्वाचं असतं.

- अमृता कदमविमानात बिझनेस क्लासनं प्रवास करायला कुणाला नाही आवडणार? पण समजा काही कारणानं बिझनेस क्लासनं प्रवास करणं जमत नसेल तरी हरकत नाही. इकॉनॉमी क्लासच्या तिकीटातसुद्धा तुम्ही आरामदायी प्रवासाची संधी मिळवू शकता. अर्थात, तुम्हाला काही खास युक्त्या माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला फार मेहनतही करावी लागणार नाही. प्रवासात तुमची प्राथमिकता काय आहे हे मात्र तुम्हाला पक्कं ठाऊक हवं. ‘स्कायस्कॅनर’ या ट्रॅव्हल पोर्टलनं काही विमान कंपन्यांचा डाटा एकत्रित करु न यासंदर्भातली निरीक्षणं नोंदवली आहेत. पुढच्या प्रवासाचं नियोजन करताना विमानात हमखास चांगली सीट मिळवण्यासाठी या निरीक्षणांचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.जर लांब पल्ल्याचा प्रवास आरामात करायचा असेल तर चांगली सीट मिळणं गरजेचं आहे. म्हणूनच तिकिट बुक करण्याआधी थोडासा होमवर्क आणि योग्य वेळेत तुमचं बुकिंग हे खूप महत्त्वाचं असतं.

 

तुमची प्राथमिकता ठरवाविमान प्रवास करताना तुम्हाला नक्की कशी सीट हवी हे आधीच ठरवा. म्हणजे पायाजवळ जास्तीची जागा असलेली सीट हवी, कमी गोंगाट असलेली सीट हवी की सर्वांत सुरक्षित सीट तुम्हाला हवी? ही प्राथमिकता एकदा ठरली की त्यानुसार तुम्हाला पसंतीक्र म ठरवणं सोपं जाईल. म्हणजे जर तुम्हाला पाय व्यवस्थित पसरु न प्रवास करणं जास्त आवडत असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला थोडासा गोंगाट सहन करायची तयारी ठेवावी लागेल. कारण अनेकदा जास्त लेग स्पेसच्या जागा या छोट्या मुलांना घेऊन प्रवास करणार्या  प्रवाशांना दिल्या जातात. जेणेकरून त्यांना फोल्डिंगचे पाळणे ठेवून बसता येईल. विमान प्रवासात जर शांतता ही तुमची प्राथमिकता असेल तर शक्यतो शेवटच्या सीट्स टाळाव्यात. तिथे हवाईसुंदर्या  खाण्यापिण्याचं सामान तयार करत असतात. टॉयलेटच्या आसपासची सीटही टाळावी कारण सतत दरवाजा वाजल्यानं तुम्हाला हवी असलेली शांतता मिळणार नाही.

 

चांगल्या रिसर्चचा फायदास्कायस्कॅनरनं साधारण चार वर्षांपूर्वी एक सर्व्हेे केला होता. त्यातून एक गंमतीशीर बाब पुढे आली. या सव्हेनुसार6 A ही सर्वांत पसंतीची सीट होती तर सर्वात कमी पसंती 31E या सीटला मिळाली. त्यामुळे तुमच्या पसंतीची सीट निवडताना स्वत: काही बाबी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला seatexpert.com सारख्या वेबसाइटची नक्की मदत होऊ शकते. म्हणजे जी सीट तुम्ही निवडत आहात तिथे लेग स्पेस कसा आहे? त्या सीटला टेकून मागे रेलता येतं का? सीटपासून टॉयलेट किती दूर आहे? या सगळ्याची माहिती तुम्हाला आधीच मिळू शकते. शिवाय ज्या सीटवर तुम्ही बसणार आहात तिथे मनोरंजनाची काय सुविधा मिळू शकेल हे देखील तुम्हाला विमानात पाऊल ठेवायच्या आधीच कळेल. अर्थात त्यासाठी गरज आहे थोड्या वेळाची आणि संशोधनाची.लवकर चेक-इनचा फायदाज्या संख्येनं लोक रोज विमान प्रवास करत असतात ते पाहता चांगली सीट मिळवण्यासाठी स्पर्धा मोठी आहे. त्यामुळे जितक्या लवकर तुम्ही चेक-इन कराल तितकी चांगली सीट मिळण्याची शक्यता जास्त. आंतरराष्ट्रीय फ्लाइट्समध्ये तर चेक-इन तुम्ही खूप आधी करु शकता. एखादी सीट काऊंटरवर तुम्हाला उपलब्ध नसेल तर आॅनलाइनही तपासून पाहा. काही विमान कंपन्या अगदी उशीरा म्हणजे फ्लाइटच्या अगदी एक आठवडा आधीही सीट रिलीज करतात. यातल्या काही ग्रूप बुकिंगसाठी किंवा नेहमीच्या प्रवाशांसाठीही राखीव ठेवल्या जातात.

 

एक स्मितहास्यही भरपूर देऊन जातंतुमच्या हसर्या  चेहर्यानंही तुम्हाला चांगली सीट मिळू शकते. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. चेक-इन करताना चांगल्या सीटबद्दल चौकशी करा. नेहमीच्या प्रवाशांसाठी सीट अपग्रेड झाल्या की इकॉनॉमी आणि प्रीमियम इकॉनॉमीमधल्या चांगल्या सीट अगदी शेवटच्या मीनिटापर्यंतही रिकाम्या असू शकतात. त्यामुळे एका स्मितहास्यानंही अशी चांगली सीट तुम्हाला मिळू शकते.