शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

गोव्याला जाणार असाल तर थोडी वाट वाकडी करून गोव्यातल्या गावातही जा! गोव्यातली गावं आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडतात.

By admin | Updated: July 12, 2017 17:00 IST

साचेबद्ध पर्यटनस्थळांच्या पलिकडेही एक गोवा आहे, ज्याचं साधं सौंदर्य आकर्षून घेणारं आहे.ती म्हणजे गोव्यातली गावं

- अमृता कदमगोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतात एकापेक्षा एक सुंदर बीचेस, चर्चेस, उत्तमोत्तम क्लब्ज आणि रेस्टॉरण्ट्स. गोव्यातल्या याच गोष्टींसाठी बरेचजण गोव्याला भेटी देतात. या साचेबद्ध पर्यटनस्थळांच्या पलिकडेही एक गोवा आहे, ज्याचं साधं सौंदर्य आकर्षून घेणारं आहे. गोव्यातली अनेक छोटी-छोटी गावं आहेत, जिकडे पर्यटकांची पावलं अजूनही वळलेली नाहीत.

या गावांमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला पोर्तुगीज पद्धतीचे काही व्हिला पहायला मिळतील. तिथूनच तुम्ही या गावांच्या प्रेमात पडायला लागाल. गोव्यातल्या गावांमधले अनेक जणं कामानिमित्त बाहेर आहेत. बहुतांश घरांमध्ये परदेशी असलेल्या मुलांचे पालकच वास्तव्याला असतात. त्यामुळे तुम्हाला या गोवन घरांमध्ये होम स्टे ची सुविधा सहज मिळू शकते. किंबहुना अनेक जणांनी आपल्या घरांची जाहीरातही Airbnb वर देऊन टाकली आहे.

 

एकदा का तुमची राहण्याची व्यवस्था झाली की, तुम्ही भटकायला मोकळे. हिरव्यागार वनराईने नटलेल्या या गावांमध्ये फिरताना तुमचा थकवा कुठल्या कुठे निघून जाईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा...या गावांमधला दिवस खूप लवकर सुरु होतो आणि रात्री आठनंतर सामसूम व्हायला सुरूवात होते. निवांतपणाबरोबरच तुम्ही मौजमजेच्या मूडमध्ये असाल तर या गावांना लागून असलेल्या शहराचा रस्ता धरु शकता. वाहन हातात असेल तर गावांपासून शहरांचा प्रवास एक-दीड तासांचा आहे. गोव्यातल्या पर्यटनामधली ही सर्वांत सोयीची बाजू.

साधारणपणे गोव्याला गेल्यावर रेस्टॉरण्टमध्ये आपण सी-फूडच ट्राय करतो. पण छोट्या गावांमध्ये तुम्हाला इथल्या पारंपरिक स्थानिक पदार्थांचीही चव चाखायला मिळेल. तुमच्या दिवसाची सुरूवात सायकलवरु न पाव विकणाऱ्या पाववाल्यांच्या आवाजानं होईल. त्यांच्याकडे मिळणारा पोई नावाचा पाव एकदा खाऊन पाहायलाच हवा. गोवेकरांना या पावाची पहिली ओळख करून दिली पोर्तुगीजांनी. गोव्यामध्ये गोडसर चवीचा, डीप फ्राय केलेला ब्रेड म्हणजेच ‘बॉन’ही आवडीनं खाल्ला जातो. गोव्याशिवाय मंगलोरमध्येही हा बॉन खायला मिळतो. तिथे हा मंगलोरी बन म्हणून ओळखला जातो. आपल्याकडची बटाट्याची भाजी गोव्यातल्या या गावांमध्ये थोडं वेगळं रु प आणि चव घेऊन कापा म्हणून समोर येते. शिवाय भोपळ्यांच्या फुलांची, शेवग्याच्या फुलांची भाजीही या छोट्या गावांमध्ये आवर्जून खायला मिळते.

 

गोव्यातलं अजून एक आकर्षण म्हणजे इथली फेणी. जर तुम्ही फेब्रुवारी ते मेच्या दरम्यान गोव्याला गेलात, तर तुम्हाला इथल्या काजूच्या बागा, काजूची फळं आणि त्यापासून बनवली जाणारी फेणी हे सगळं पहायला मिळू शकतं. गोव्यामध्ये काजूच्या बागा आहेत आणि फेब्रुवारी ते मे या काळात म्हणजे जेव्हा फळं तयार होतात तेव्हा इथले गावकरी आपापल्या बागांची निगराणी करतात. फळांची तोडणी, फळांपासून बिया वेगळ्या करणं, नंतर ही फळं आंबवून त्यापासून फेणी करणं हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवू शकता.

 

इथल्या बॅकवॉटर्सचा फेरफटका मारु न तुम्ही इथे चालणारी मासेमारी पाहू शकता. गोव्यातल्या लहान गावांमध्येही चर्चेस आहेत. या चर्चेसच्या प्रांगणात संध्याकाळी काही कार्यक्र मही केले जातात. दिवसभर फिरु न कंटाळल्यावर तुम्ही इथे कोकणी नाटकाचा किंवा आणखी कोणत्यातरी सांस्कृतिक कार्यक्र माचा आनंद घेऊ शकता.

आणि हो, गोवन गावांमध्ये आल्यावर तुम्ही तुमच्या रोजच्या कामाच्या गडबडीत जी गोष्ट करत नाही ती आवर्जून करा, ती म्हणजे लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठून पहाट अनुभवणं! गोव्यातल्या गावांमधला हा अनुभव तुम्ही कधीच विसरू शकणार नाहीत असाच असेल!