शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात हवं तितकं फिरा पण तब्येत बिघडणार नाही म्हणून काही गोष्टी अवश्य करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 17:34 IST

थंडीच्या दिवसात सहलीदरम्यान तब्येत बिघडली, सर्दी-डोकेदुखी सुरु झाली की रसभंग होतो. म्हणूनच हिवाळी सुट्टी मजेत जावी यासाठी काही टिप्स जरूर लक्षात ठेवाव्यात.

ठळक मुद्दे* हिवाळ्यातल्या सुट्टीसाठी पॅकिंग करताना कपड्यांच्या बाबतीत अजिबात कंजुषी करु नका.* सामानात हळद जरु र ठेवा. हवेत अचानक बदल झाला की अनेकांना लगेचच सर्दीचा त्रास सुरु होतो. अशावेळी थोडीशी हळद तुमच्यासोबत असू द्या.* अधूनमधून स्नायू ताण देऊन मोकळे करा. जेव्हा प्रवास लांबचा असतो तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवून करण्याची गरज असते.

 

- अमृता कदम

 

हिवाळा म्हटलं की जवळ, लांब भटकायची, फिरायला जायची हुक्की येतेच. विशेषत: नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरमध्ये फिरण्याचे बेत आखले जातात. या काळात थंडीही चांगलीच वाढलेली असते. त्यामुळे या काळात फिरताना काळजीही घ्यावी लागते. सहलीदरम्यान तब्येत बिघडली, सर्दी-डोकेदुखी सुरु झाली की रसभंग होतो. म्हणूनच हिवाळी सुट्टी मजेत जावी यासाठी काही टिप्स जरूर लक्षात ठेवाव्यात.

 

 

हिवाळ्यात फिरण्याचे नियम1. हिवाळ्यातल्या सुट्टीसाठी पॅकिंग करताना कपड्यांच्या बाबतीत अजिबात कंजुषी करु नका. ज्या ठिकाणी तुम्ही जात आहात, तिथे तापमान किती कमी होतं, याची थोडीशी माहिती आधीच करून घ्या. त्यानुसार पुरतील असे शॉल, स्वेटर आणि थर्मल्स असे कपडे सोबत ठेवा.2. टॉवेल आणि मोज्यांचे जास्ती जोड घ्यायला विसरु नका. हिवाळ्यात रोजच्या वापरातल्या या गोष्टी लवकर सुकत नाहीत. त्यामुळे दोनपेक्षा अधिक जोड घेतले तर काळजीचं कारण उरत नाही. ओले किंवा मळकेच कपडेही घालवे लागत नाहीत.3. सामानात हळद जरु र ठेवा. हवेत अचानक बदल झाला की अनेकांना लगेचच सर्दीचा त्रास सुरु होतो. अशावेळी थोडीशी हळद तुमच्यासोबत असू द्या. थंडीपासून वाचण्यासाठी हे आयुर्वैदिक औषध एकदम रामबाण उपाय आहे. हळद उष्ण असल्यानं ती दुधासोबत घेणं अशावेळी फायदेशीर ठरतं.4. अधूनमधून स्नायू ताण देऊन मोकळे करा. जेव्हा प्रवास लांबचा असतो तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवून करण्याची गरज असते. गाडीतून थोड्या वेळासाठी जरी उतरलात तरी शरीराचे स्नायू एकदम ताण देऊन मोकळे करा. कारण त्यामुळे शरीरात रक्त गोठून, स्नायू आखडत नाहीत. म्हणजे प्रवासानं जाम व्हायला होत नाही.5. बर्फाळ प्रदेशात स्नो फॉल पाहण्यासाठी जाणार असाल तर थोडी जास्त काळजी घ्या. बर्फावर जास्त काळ चालू नका. त्यामुळे स्नायू बधीर होऊन त्रास होण्याची शक्यता असते.6. प्रवासात इकडचं तिकडचं पाणी पिऊन सर्दी, घसा खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी शक्य असेल तिथे गरम पाणीच प्या. शिवाय सोबत एखादी गरम पाण्याची बाटलीही जरु र ठेवा.7. प्रवास बसने असेल किंवा रेल्वेने. जास्त वेळ खिडकी उघडी ठेवू नका. कारण थंड हवेचा झोत थेट शरीरावर येत राहिल्यास शरीर आखडून जातं.8. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे सोबत विंटर केअर लोशन, लिप बाम, तेलाची छोटी बाटली असू द्या.