शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शिक्षकांनीच गणित केले हलकेफुलके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:00 IST

ज्याप्रमाणे हाडाचा शिक्षक असतो त्याप्रमाणे हाडतुड करणारा शिक्षक असतो, हाडं खिळखिळी करणारा शिक्षकही असतो. शिक्षकाचे हे नवनवीन प्रकार विद्यार्थ्यांनी शोधून काढले आहेत

ठाणे : ज्याप्रमाणे हाडाचा शिक्षक असतो त्याप्रमाणे हाडतुड करणारा शिक्षक असतो, हाडं खिळखिळी करणारा शिक्षकही असतो. शिक्षकाचे हे नवनवीन प्रकार विद्यार्थ्यांनी शोधून काढले आहेत. ‘अरे वा आता या सरांचा तास आहे’, अशी उत्साहवर्धक प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या मुखातून बाहेर पडते तशीच ‘अरे देवा, या सरांचा तास आहे’, असा निराशाजनक सूर विद्यार्थी लावतात. ‘आज आपण अवघड विषय शिकूया’, असे शिक्षकानेच म्हटल्यावर शिक्षकालाच जो विषय अवघड वाटतो त्याचा विचार विद्यार्थी सोडून देतात, अशा अनेक गमतीशीर किस्से आणि त्यावरील हास्यविनोदांनी चवथ्या जिल्हास्तरीय गणित अध्यापक कार्यशाळेचे वातावरण हलकेफुलके केले.ठाणे जिल्हा गणित अध्यापक मंडळ व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने ही दोन दिवसीय कार्यशाळा टिपटॉप प्लाझा येथे आयोजित केली आहे. मंगळवारी कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी चार गणिततज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. आरमाईट इंजिनिअरिंग कॉलेजचे अध्यक्ष बोथ्रा यांनी ‘गणित शिक्षक व विद्यार्थी सुसंवाद साधूया’ या विषयावर मार्गदर्शन केले. हल्ली विद्यार्थ्याने गणित न सोडवता थेट उत्तर दिले तर शिक्षक त्याला चूक देतात, मात्र शिक्षकांकडे नसलेली पद्घत हल्लीच्या विद्यार्थ्यांकडे असते. ती नाकारू नका त्यांच्याकडून नवीन शिका. पुस्तकात अडकून न पडता मुलांना जास्त बोलते करा.भारत हा विकसनशील देश आहे असे प्रत्येकजण आपल्या जन्मापासून ऐकतोय मात्र अद्याप भारत विकसित झालेला नाही. भारताला विकसित केवळ शिक्षकच करू शकतात. अखंड देश घडवण्याची ताकद शिक्षकांमध्ये आहे, असे मत बोथ्रा यांनी व्यक्त केले. दुपारच्या सत्रात गणिततज्ज्ञ व लेखक दिलीप गोटखिंडीकर यांनी ‘स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणिताची तयारी’ या विषयावर संवाद साधला.नुकत्याच झालेल्या गणित आॅलिंम्पियाडमध्ये भारताने वर्चस्व राखले. यावरून भारतीय गणित विषयाचे पक्के आहेत, हे लक्षात येते. गणित हा असा विषय आहे. ज्याच्या चाळणीतून काही गाळले असता शुद्ध गणितच बाहेर पडते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गणित शिकवायला जाताना पूर्वतयारीनिशी जावे आणि अध्ययनातून चांगले गणिततज्ज्ञ घडवावे, असे मत गोटखिंडीकर यांनी व्यक्त केले.प्रसिद्ध गणिततज्ज्ञ रवींद्र येवले यांनी ‘हसतखेळत गणित शिकवूया’ या विषयावर हसतखेळत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसमोर जाताना चेहरा हसरा ठेवावा आणि तसेच ताण वाटणार नाही असे अध्ययन कराल तेव्हा गणित सोपं होईल. मूळात जे शिक्षक विद्यार्थ्यांच्या आवडीचे असतात त्यांचा विषयही विद्यार्थ्यांच्या आवडीचा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आवडीचे बनण्याचा प्रयत्न करा आणि अवघड गणित सोपं करून सांगा. संस्कृतमधील गीता ज्ञानेश्वरी माऊलींनी मराठीत भाषांतर करून सामान्यांना कळेल अशा भाषेत आणली. त्यामुळे आपलं बोलणं सामान्य विद्यार्थ्याला कळलं पाहिजे याकडे लक्ष द्या.एखादी संकल्पना विद्यार्थ्याला कळली म्हणजे सगळ्यांना कळली असे नसते. प्रत्येक बाकावरचा प्रत्येक विद्यार्थी हा वेगळाच असतो, हे लक्षात घेऊन शिकविताना विविधता ठेवा, असे मत येवले यांनी व्यक्त केले.