शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शिवसेनेच्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, २२०० उमेदवारांना नियुक्तीपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 04:29 IST

२२०० उमेदवारांना नियुक्तीपत्र : बालाजी किणीकरांनी केले कौतुक

बदलापूर : शिवसेना दत्तवाडी शाखा व नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्यावतीने बदलापूरमध्ये शनिवारी रोजगार मेळावा झाला. या मेळाव्याला तरु णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात नावनोंदणी केलेल्या २५०० पैकी २२५० उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी २२०० उमेदवारांना विविध कंपन्या, बँका आदींकडून नोकरीसाठी आॅन द स्पॉट आॅफर लेटर देण्यात आले अशी माहिती आयोजक शैलेश वडनेरे यांनी दिली. अशा प्रकारच्या रोजगार मेळाव्यांमुळे उमेदवार आणि सुशिक्षित बेरोजगारांना बदलापूरमध्येच नोकऱ्या उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी वडनेरे यांचे कौतुक केले.

शनिवारी ज्ञानेशवर सभागृह, मराठी शाळा, गांधी चौक बदलापूर पूर्व येथे हा रोजगार मेळावा झाला. या रोजगार मेळाव्यात पाचवी, दहावी, बारावी ते पदवीधर अशी शैक्षणिक पात्रता असणाºया तरु णतरु णींना विविध नामांकित कंपन्या, लॉजिस्टिक सेंटर, बँका,आयटी, फायनान्स, रिटेल, केपीओ, बीपीओ, एयरपोर्ट, हॉस्पिटॅलिटी, विमा आदी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आली. आयसीआयसीआय, एचडीएफसी आदींसह अंबरनाथ,भिवंडी येथील अनेक नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. संबंधित कंपन्यांच्या अधिकाºयांनी मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. अंबरनाथ, बदलापूर व मुरबाड परिसरातील तरु णतरूणींचा त्यामध्ये सहभाग होता.या रोजगार मेळाव्यात पाचवीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाºया तरु णतरु णींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याचे वडनेरे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, बदलापूरच्या नगराध्यक्षा विजया राऊत, नगरसेविका शीतल राऊत, नगरसेवक तुषार बेंबळकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेShiv Senaशिवसेना