टिटवाळा : मानिवली गावालगत वाहणा-या उल्हास नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पाच मित्रांपैकी सादाब मुताईत शेख (१२) याचा रविवारी बुडून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी १७ तासांनंतर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढला.भायखळ्यातील आगरीपाडा येथून सहा मित्र त्यांचे नातेवाइक अजमेरी महमद अतित शेख हिच्याकडे आले होते. अजमेरीने नांदप येथे रूम घेतली आहे. तिच्या घरातील सामान शिफ्ट करून झाल्यानंतर पिकनिक करण्याचा बेत त्यांनी आखला होता.
उल्हास नदीत मुलगा बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:43 IST