शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

कंत्राटदाराची केडीएमटीला नोटीस

By admin | Updated: October 25, 2016 03:43 IST

‘नकटीच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्ने’ ही म्हण कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाला तंतोतंत लागू होत आहे. एकीकडे दुरवस्थेच्या गर्तेत सापडलेल्या

- प्रशांत माने, कल्याण‘नकटीच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्ने’ ही म्हण कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाला तंतोतंत लागू होत आहे. एकीकडे दुरवस्थेच्या गर्तेत सापडलेल्या केडीएमटीच्या आगारांचा कायापालट करण्यासाठी नुकत्याच झालेल्या स्थायी समितीत हिरवा कंदील दाखवला असताना दुसरीकडे एक कोटी ७९ लाखांचे बिल थकल्याने देखभाल दुरुस्तीचे कंत्राट असणाऱ्या कंपनीने केडीएमसीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या कंपनीने दिल्ली न्यायालयात धाव घेतली आहे. महापालिकेने या नोटिशीला उत्तर दिले आहे. कंत्राटदार आणि आयुक्त ई. रवींद्रन यांच्यात यासंदर्भात बैठका सुरू आहेत. त्यात काय तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे. सध्या केडीएमटी सर्वस्वी महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून आहे. २०१४ च्या सरकारी आदेशानुसार ज्या परिवहन संस्थेच्या संचालनात जी तूट होते, ती संबंधित महापालिकेने भरून काढली पाहिजे, असा नियम आहे. परंतु, महापालिकेचीच आर्थिक स्थिती फारशी आलबेल नसल्याने आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, अशी चित्रे नेहमीच पाहायला मिळतात. केडीएमटीचे उत्पन्न एक कोटी ९० लाख रुपये इतके आहे; परंतु, यातील एक कोटी ६० लाख रुपये केवळ कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होत आहेत. महापालिकेकडे दरमहिन्याला वेतनासाठी साकडे घालावे लागते. मात्र, अनुदान वेळेवर मिळत नसल्याने वेतनाची दरमहिन्यात रखडपट्टी होते. त्यातच डिझेल खरेदीवर एक कोटी २० लाख, देखभाल-दुरुस्तीवर ३० लाख, इंधनखरेदीवर १० लाख असा महिन्याला खर्च होत आहे. उपक्रमाचे उत्पन्न आणि खर्च यात प्रचंड तफावत आहे. त्याचा फटका उपक्रमाला बसत असल्याने आर्थिकस्थिती पुरती डबघाईला आल्याचे चित्र आहे. सध्या कोटींची देयके थकीत आहेत. देखभाल-दुरुस्ती, सुटेभाग देणाऱ्या कंत्राटदाराचे देयकही देऊ शकलेले नाहीत. दिल्लीतील ‘शामा अ‍ॅण्ड शामा’ कंपनीला २०१४ पासून देखभाल दुरुस्तीचे कंत्राट दिले आहे. सध्या कंपनीचे एक कोटी ७९ लाखांचे बिल थकीत आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही केडीएमटीने त्यांचे थकीत बिल न दिल्याने कंपनीने दिल्लीतील न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात केडीएमसीला कायदेशीर नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे थकीत बिलामुळे काही दिवसांपासून कंत्राटदाराने देखभाल-दुरुस्तीचे काम करणे बंद केले होते. दरम्यान, आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेनंतर काम सुरू केल्याची सूत्रांनी सांगितले. थकीत बिल अदा कसे करायचे?केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी महापालिका प्रशासन दरमहिन्याला एक कोटीचे अनुदान देते. त्यातील काही रक्कम ही कंत्राटदाराचे थकीत बिल देण्यासाठी वापरावी, असा निर्णय मध्यंतरी झाला होता. परंतु, जे अनुदान मिळते ते कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही पुरत नाही. त्यामुळे बिल अदा कसे करायचे, असा प्रश्न केडीएमटीला पडला आहे.कायदेशीर नोटिशीला उत्तरकंत्राटदाराच्या नोटिशीला केडीएमटीने उत्तर दिले आहे. काम सुरू करण्यासंदर्भात आयुक्तांबरोबर बैठक होत आहे. सध्या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे. बिल लवकरच अदा केले जाईल, असे कंत्राटदाराला स्पष्ट केल्याचे केडीएमटीचे व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी सांगितले. कंत्राटदाराचे काम असमाधानकारक देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराचे काम असमाधानकारक असल्याबाबत आयुक्तांकडे परिवहन समितीने तक्रारी केल्याची माहिती सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी दिली.कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली असलीतरी आयुक्तांबरोबर चर्चा सुरू आहे. काम समाधानकारक नसल्याने त्याचे बिल थकीत आहे, असे चौधरी यांचे म्हणणे आहे. कंत्रादाराचे देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यात गाड्या बंद पडत आहेत, ब्रेकडाउन होत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.