शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

मंडईची वास्तू पडूनच; रहिवाशांना घ्यावी लागते डोंबिवलीत धाव

By admin | Updated: August 21, 2015 02:17 IST

वाढत्या शहरीकरणात अल्पावधीतच ठाकुर्लीचा चेहरामोहरा बदलला. जेथे कधीकाळी जायलाही भयावह वाटायचे, त्या खंबाळपाडा परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत

अनिकेत घमंडी, डोंबिवलीवाढत्या शहरीकरणात अल्पावधीतच ठाकुर्लीचा चेहरामोहरा बदलला. जेथे कधीकाळी जायलाही भयावह वाटायचे, त्या खंबाळपाडा परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. केडीएमसी क्षेत्रातील एकमेव असा ९० फुटी रस्ता ही नव्याने ओळख असलेला हा वॉर्ड तुलनेने मोठाही आहे. नियोजनबद्ध इमारती-रस्ते या ठिकाणी तयार होत असतानाच मूलभूत गरजांसाठी मात्र या ठिकाणच्या नागरिकांना डोंबिवलीवरच अवलंबून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे भाजी मंडईची प्रशस्त जागा असूनही केवळ महापालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे ती सुविधा मिळत नसल्याने महिलावर्गासह ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा होते.येथील मंगलकलश सोसायटीमध्ये मंडईसाठी महापालिकेची सुमारे १५०० स्क्वे. फूट ग्राउंड प्लस वन सुसज्ज जागा आहे. तेथे इमारतीचे काम पूर्ण झाले, नागरिक वास्तव्याला गेले, पाठोपाठ परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. त्यात २४ तास पाण्याची सुविधा, डांबरीकरणाचे चांगले रस्ते आदी असले तरीही भाजी, मच्छी, किराणा या जीवनावश्यक बाबींसाठी नागरिकांना अद्यापही डोंबिवली अथवा ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात १.५ ते २ किमी जावे लागते. वॉर्डाचा बहुतांशी भाग हा एमआयडीसी क्षेत्रालगत असल्याने प्रदूषणाचीही समस्या आहेच. अनेकदा संध्याकाळच्या वेळी या ठिकाणाहून प्रवास करणे नकोसे होते, तशा अवस्थेत वर्षानुवर्षे लोक येथे राहतात. खंबाळपाड्यातच परिवहनचा मोठा भूखंड आहे, मात्र तेथेही प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे बसेस उभ्या राहण्याऐवजी कचऱ्याच्या गाड्या उभ्या राहतात. असे असूनही या ठिकाणची कचरा निर्मूलनाची समस्या आहेच. लाखाच्या घरात असलेल्या वस्तीसाठी अवघे ६ सफाई कर्मचारी, तेही पूर्णपणे येत नाहीत. या ठिकाणी तीन स्मशानभूमी असून एक स्मशानभूमी अद्ययावत आहे, तर अन्य एका ठिकाणी २९ लाख खर्चून शोकसभागृह व १४ लाखांच्या लाद्या बसवण्यात येणार आहेत. सध्या तरी त्या ठिकाणी प्रचंड गैरसोय असून तो गर्दुले व तळीरामांचा अड्डा बनला आहे. तिसरी रस्त्यालगत असून त्याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. कृत्रिम तलाव असून या ठिकाणी बहुतांशी सार्वजनिक मंडळे, घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाते.परिवहन सेवेचा लाभही येथील नागरिकांना मिळत नाही. येथूनच हाकेच्या अंतरावर पेंढरकर महाविद्यालय, मंजूनाथ कनिष्ठ महा., सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर, क्रीडा संकुल, डोंबिवलीकरांचे भूषण असलेल्या कॅ. विनयकुमार सच्चान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ असलेला शौर्यगाथा सांगणारा ‘रणगाडा’, घरडा सर्कलचे फाउंटन आदी महत्त्वाची, विरंगुळ्याची ठिकाणे आहेत. त्यामुळे येथे नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, रात्री-अपरात्री नाटक सुटल्यावर बसची सुविधा नसल्याने रिक्षा, टॅक्सी वाहने शोधताना नागरिकांच्या नाकीनऊ येतात. त्यामुळे खंबाळ पाड्यातून ठाकुर्ली - डोंबिवलीसाठी मध्यरात्रीपर्यंत परिवहनची सुविधा असणे आवश्यक आहे.