शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

मलंगगडाची फेनिक्युलर ट्रॉली मार्चपर्यंत होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 01:07 IST

कल्याणजवळील हाजीमलंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मलंगगडावर जाण्यासाठी फेनिक्युलर ट्रॉली एक दशकापेक्षा अधिक काळापासून तयार होत आहे.

ठाणे : कल्याणजवळील हाजीमलंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मलंगगडावर जाण्यासाठी फेनिक्युलर ट्रॉली एक दशकापेक्षा अधिक काळापासून तयार होत आहे. आता ९८ पिलरवर चालणारी ही ट्रॉली यंदाच्या मार्चअखेरपर्यंत सुरू करण्याचा दावा बांधकाम विभागाने केला आहे. परंतु, गडावर जाण्यासाठी सद्य:स्थितीला पायऱ्या तयार करणे गरजेचे असून त्यासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाचा आग्रह खासदार श्रीकांत शिंदे यांनी डीपीसीच्या बैठकीत धरला.मलंगगडावर फेनिक्युलर ट्रॉलीने जाण्याचे भक्तांचे स्वप्न अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. सुप्रीमो कंपनीला दिलेले हे काम आता जोशी नावाच्या ठेकेदाराकडून करून घेतले जात आहे. ९८ पिलरवर ही ट्रॉली भाविकांना गडावर नेणार आहे. यापैकी ८३ पिलर पावसाळ्याआधी तयार होते. उर्वरित १५ पिलरपैकी पावसाळ्यात काम सुरू ठेवून सुमारे ११ पिलरचे बांधकाम पूर्ण झाल्याचा दावा डीपीसीत करण्यात आला. उर्वरित चार पिलरचे कामही युद्धपातळीवर हाती घेऊन मार्चअखेरपर्यंत फेनिक्युलर ट्रॉली भाविकांच्या सेवेत तैनात करण्याची ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदेयांना बांधकाम खात्याने या बैठकीत दिली.मलंगगडाचा हा जंगलपट्टा इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये आहे. पर्यावरण व वनखात्याची परवानगी घेऊन या फेनिक्युलर ट्रॉलीचे काम हाती घेतले आहे.या प्रकल्पाच्या नंतर नाशिकच्या वणी गडावर या ट्रॉलीचा प्रयोग हाती घेऊन तो सुरूही झाला आहे. त्या आधीचा हा आपला प्रकल्प मात्र अजूनही पूर्ण होत नसल्याची खंत पालकमंत्र्यांसह या प्रकल्पास प्रारंभ करणारे आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केली.या फेनिक्युलर ट्रॉलीसाठी सुमारे अडीच एकर जमीन प्राप्त केली आहे. त्यासाठी सर्वाेच्च न्यायालयासह इको सेन्सेटिव्ह झोनची परवानगीदेखील घेतली आहे. मात्र, सुप्रीमो या ठेकेदार कंपनीच्या गलथानपणामुळे हा प्रकल्प रखडल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या या मनमानीमुळे आता या प्रकल्पाचे काम जोशी या ठेकेदार कंपनीला दिले. त्यांचे बिल मात्र सुप्रीमोकडून वसूल केले जात असल्याचेही बांधकाम विभागाने सांगितले.>प्रस्तावास विलंब झाल्याने संताप ! : गडावर जाण्यासाठी असलेल्या पारंपरिक पद्धतीच्या पायºया आता तुटल्या आहेत. त्या नव्याने तयार करण्याची गरज असल्यामुळे सुमारे १० कोटींचा प्रस्ताव ठाणे जिल्हा परिषदेकडून येणे अपेक्षित होता. त्यासही विलंब झाल्याने खर्च वाढला असून आता या कामासाठी सुमारे २५ कोटींचा प्रस्ताव त्वरित तयार करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली असून तिला विलंब झाल्याने त्यांनी बैठकीत संताप व्यक्त केला.>या पायºयांसाठी वनविभाग व तेथील ट्रस्ट मंजुरी देत नसल्याचे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सांगितले. अखेर, मंजुरीसाठी वनविभागाची ग्वाही देऊन २५ कोटींचा प्रस्ताव तत्काळ तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी जिल्हा परिषदेला दिले.