ठाणे : राज्य शासनाने इमारत बांधकामांसाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्यांची संख्या कमी करून, त्यांचा कालावधी हा ६० दिवसांवर आणण्याचे निश्चित केले आहे. याचा फायदा बिल्डरांसह ग्राहकांनाही होणार आहे. ही प्रक्रिया ६० दिवसांत पूर्ण झाल्यास ग्राहकांना १० ते १५ टक्के स्वस्त दरात घरे उपलब्ध होऊ शकतील, असा अंदाज महाराष्ट्र चेंबर आॅफ हाउसिंग इंडस्ट्रीजच्या ठाणे युनिटचे (एमसीएचआय - क्रेडाई - ठाणे) अध्यक्ष अजय अशर यांनी व्यक्त केला.एमसीएचआय क्रेडाई ठाणेच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या प्रॉपर्टी एक्सपो २०१६ च्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे सांगितले.
ग्राहकांना स्वस्त दरात घरे
By admin | Updated: January 5, 2016 03:02 IST