शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

घोलवडचे चिकू अतिवृष्टीने संकटात

By admin | Updated: August 10, 2016 02:28 IST

मागील पंधरवड्यापासून डहाणू तालुक्यात अतिवृष्टी होऊन बागायतींमधील चिकू फळाची मोठ्या प्रमाणात फळगळती झाली आहे. त्यामुळे आगामी काळात चिकू उत्पादन घटून बागायतदारांवरील

अनिरुद्ध पाटील, डहाणू/बोर्डी मागील पंधरवड्यापासून डहाणू तालुक्यात अतिवृष्टी होऊन बागायतींमधील चिकू फळाची मोठ्या प्रमाणात फळगळती झाली आहे. त्यामुळे आगामी काळात चिकू उत्पादन घटून बागायतदारांवरील आर्थिक संकटाची छाया गडद झाली आहे. दरम्यान शासनाने चिकू पिकाला नुकसान भरपाई जाहीर करून विम्याची संपूर्ण रक्कम तत्काळ देऊन मदतीचा हात द्यावा अशी मागणी चिकू उत्पादकांनी केली आहे. डहाणू तालुक्यातील चिकू हे प्रमुख फळपीक असून साडेचारहजार हेक्टर क्षेत्र बागायतीने व्यापले आहे. साडेतीन वर्षांच्या अथक प्रयत्नाने यावर्षी पाच पिकांना भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे. त्यामध्ये चिकूचा समावेश करण्यात आला असून डहाणूतील महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाने या साठी अर्ज केला होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने येथील चिकूवर घोलवड या प्रादेशिक ओळखीच्या प्रमाणपत्राची मोहर उमटली आहे. जागतिक बाजारपेठेत चिकूचे दर्जेदार फळ पाठविल्यानंतर या भागाची वेगळी ओळख आणि उत्पादकांना भरघोस आर्थिक लाभ मिळणार असल्याने चिकू बागायतदारांनी कर्ज काढून मजूर, विविध खते व औषधे इ. करिता मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे. या वर्षी पावसाचे वाढते प्रमाण सुखावणारे असले, तरी मागील पंधरवड्यापासून डहाणू तालुक्याला पावसाने झोडपल्याने चिकूवर बुरशीजन्य रोगाची लागण झाली आहे. पडत्या पावसात औषध फवारणी करणे अशक्य असून परिणामकारक नाही. शिवाय जोराचे वारे आदीमुळे मोठ्याप्रमाणावर चिकूची फळगळती झाली आहे. चिकूच्या तिन्ही बहरांवर अनिष्ट परिणाम होऊन वर्षभरातील एकूण उत्पादनाचे गणित बिघडले आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन बागायतदार देशोधडीला लागणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर या वर्षी चिकूला फळपीक विम्याचे संरक्षण लाभले मात्र विम्याची रक्कम भरण्याचा कालावधी अल्पदिवसांचा होता. शिवाय शेवटच्या घटकापर्यंत माहिती न पोहचल्याने निम्मे चिकू बागायतदार विम्याच्या कवचपासून वंचित राहिले आहेत. दरम्यान या संकटातून सावरण्यासाठी चिकू पीक विम्याची शंभर टक्के रक्कम चिकू उत्पादकांना तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी कृषिभूषण यज्ञेश सावे यांनी लोकमतच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. (वार्ताहर)