शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

सहा लाखांचे उत्पन्न असूनही नायगाव रेल्वे स्थानक दुर्लक्षित

By admin | Updated: January 21, 2016 02:26 IST

दिवसाला सरासरी ५० हजारांच्या आसपास प्रवासी, सुमारे सहा लाखांचे उत्पन्न असलेले नायगाव रेल्वे स्टेशन पूर्वीपासून दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिल्याने येथे कोणत्याही प्राथमिक

वसई : दिवसाला सरासरी ५० हजारांच्या आसपास प्रवासी, सुमारे सहा लाखांचे उत्पन्न असलेले नायगाव रेल्वे स्टेशन पूर्वीपासून दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिल्याने येथे कोणत्याही प्राथमिक सुविधा नाहीत. परिणामी, प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या स्टेशनवरून मुंबईत नोकरी-व्यवसाय करणारेच प्रवास अधिक असल्याने सतत धकाधकी आणि धावपळीच्या युगात वावरणाऱ्या प्रवाशांना स्टेशनवरील गैरसोयी जणू काही अंगवळणी पडल्या आहेत.कित्येक वर्षे रखडलेला पूर्व-पश्चिमेस जोडणारा सब वे काही महिन्यांपासून सुुरू करण्यात आला आहे. पण, रात्रीच्या वेळी सब वेत सुरक्षारक्षकाची व्यवस्था नसल्याने महिलांना सब वे ने ये-जा करण्याची भीती वाटत असते. सब वेचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने पावसाळ्यात पाणी गळत असते. तसेच पाणी साचून राहिलेले असते. साफसफाई केली जात नसल्याने सब वेत घाण आणि दुर्गंधी पसरलेली असते. सब वेतील लाद्या अनेक ठिकाणी तुटलेल्या आहेत. स्टेशनवर कायमस्वरूपी पोलीस नसल्याने रात्री-अपरात्री महिला प्रवाशांना ये-जा करताना काळजी घ्यावी लागते. रात्रीच्या वेळी स्टेशनवर भिकारी आणि गर्दुल्ले निवाऱ्यासाठी येतात. पोलीस नसल्याने त्यांचा उपद्रव प्रवाशांना सहन करावा लागतो. स्टेशनवर पुरेसे पंखे नाहीत. विजेची सोय नसल्यानेही स्टेशनवर अधिकतर उजेड कमी असल्याने अंधुक प्रकाशात गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या विशेषत: महिला प्रवाशांची गैरसोय होताना दिसते. चारही फलाटांवर बसण्यासाठी पुरेशी बाके नाहीत. रेल्वे फलाटांची उंची जास्त असल्याने गाडीतून चढउतार करताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. स्टेशनवर सीसीटीव्हीची व्यवस्था नाही. काही अनुचित प्रकार घडल्यास वसई रेल्वे स्टेशनवर येऊन पोलिसांकडे तक्रार करावी लागते. स्टेशनच्या पूर्व आणि पश्चिमेला एकेक तिकीट खिडकी आहे. त्यातही दोन्ही बाजूला एकेक खिडकी उघडी असते. पूर्वेला तिकीट खिडकीजवळ दोन आणि पश्चिमेला तीन एटीव्हीएम मशिन्स आहेत. स्टेशनवर आरपीएफ आणि रेल्वे पोलीस दिसत नाहीत. रात्रीच्या वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास कुणाकडे धाव घ्यायची, असा महिला प्रवाशांचा सवाल आहे. गेल्या वर्षभरात स्टेशन परिसरात रेल्वे अपघातात ११ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. कित्येक वेळा रेल्वे अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने मदत मिळणे खूपच कठीण असते. स्टेशनवर सोयीसुविधांची कमतरता असून स्टेशनबाहेरही प्रवाशांना कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत. रेल्वेने प्रवास करणारे बहुतांश प्रवासी दुरून मोटारसायकलीवरून येतात. पण, स्टॅण्डमध्ये अपुरी जागा असल्याने प्रवासी बाहेर मुख्य रस्त्याच्या दुतर्फा गाड्या पार्क करून दिवसभरासाठी निघून जातात. (प्रतिनिधी)