शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अंमलबजावणीचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2016 02:48 IST

फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी शासन निर्णयानुसार सहा महिन्यात करणे अपेक्षित असतांनाही आज साडेतीन वर्षे उलटूनही महापालिका क्षेत्रात फेरीवाला

ठाणे : फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी शासन निर्णयानुसार सहा महिन्यात करणे अपेक्षित असतांनाही आज साडेतीन वर्षे उलटूनही महापालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणीच झालेली नाही. या धोरणाच्याअंमलबजावणी करण्यासाठी ठाणे महापालिकेने जून २०१४ पासून शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी करण्यास सुरवात होती. आता त्यांची नोंदणी झाली असली तरी केवळ मुंब्रा प्रभाग समितीमधील फेरीवाल्यांचा बायोमेट्रीक सर्व्हेच अद्याप पूर्ण न झाल्याने पुढील सर्वच प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. तसेच इतर प्रभाग समितींचा बायोमेट्रीक सर्व्हेदेखील धिम्या गतीने सुरु असल्याने जोपर्यंत तो पूर्ण होत नाही, तो पर्यंत स्पॉट अंतिम करुन, या फेरीवाल्यांना अधिकृत कार्ड वाटपही करता येणे शक्य नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यामुळे फेरीवाला धोरणाची अंतिम प्रक्रियादेखील लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या तीन वर्षापासून कागदावर असलेल्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी जून २०१४ पासून पालिकेने सुरु केली आहे. शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी करण्यासाठी प्रभाग समिती निहाय ५० हजार अर्जांची छपाई पालिकेने केली होती. प्रत्यक्षात आतापर्यंत पालिकेकडून १० हजार ८४२ अर्जांचे वितरण झाले होते. त्यात ७ हजार ९८० फेरीवाल्यांनी संपूर्ण फॉर्म भरले आहेत. परंतु अपेक्षित संख्येपेक्षा कमी फेरीवाल्यांनी नोंदणी केल्याने शहरात नेमके फेरीवाले कीती याची माहिती घेण्यासाठी पालिकेने पुन्हा आॅन दी स्पॉट सर्व्हे सुरु करुन त्यांचा बायोमेट्रीक सर्व्हे सुरु डिसेंबर २०१५ मध्ये सुरु केला होता. त्यानुसार मुंब्रा प्रभाग समिती वगळता इतर प्रभाग समितीचा सर्व्हे हा अर्ध्याहून अधिक झाला असून हा आकडा ४ हजार ४९२ इतका असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तसेच उर्वरित सर्व्हे हा एका महिन्याच्या आत पूर्ण केला जाईल असा दावाही पालिकेने केला आहे. परंतु मुंब्रा प्रभाग समितीचे काम अद्यापही पेंडीग असल्याची माहिती या बायोमेट्रीक सर्व्हेच्या निमित्ताने पुढे आली आहे. पालिकेच्या म्हणन्यानुसार येथील फेरीवाले सहकार्य करीत नसल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्यांनी सहकार्य केले तर एका महिन्याच्या आत या हा बायोमेट्रीक सर्व्हे पूर्ण केला जाईल, असा दावा पालिकेने केला आहे. दरम्यान प्रभाग समितीमधील फेरीवाल्यांचे बायोमेट्रीक सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार पात्र फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र देऊन पुढील कार्यवाही होणार आहे. यासाठी साधारणपणे एक ते दीड महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो असे पालिकेने स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात हे काम केव्हा पूर्ण होणार याबाबत पालिकाही साशंक आहे.