शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

खंडणीवसुलीसाठी केली व्यापाऱ्याविरुद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 03:32 IST

अक्कलकुव्याच्या व्यापा-याकडून दोन लाख १० हजारांची खंडणी उकळणा-या ‘त्या’ तरुणीने हा कट सफल होण्यासाठी १० जुलै रोजी दुपारी त्याच व्यापा-याविरुद्ध तक्रारही केली होती.

- जितेंद्र कालेकर ठाणे : लैंगिक अत्याचाराची तक्रार करण्याची धमकी देत अक्कलकुव्याच्या व्यापा-याकडून दोन लाख १० हजारांची खंडणी उकळणा-या ‘त्या’ तरुणीने हा कट सफल होण्यासाठी १० जुलै रोजी दुपारी त्याच व्यापा-याविरुद्ध तक्रारही केली होती. या तरुणीसह तिला मदत करणारा रिक्षाचालक तसेच येऊरच्या बंगल्यावर आलेले अन्य दोघेजण असे कोणीही पोलिसांच्या अद्याप हाती लागलेले नाही.व्यापारी रिजवान मेमन (२२) आणि त्याचा मित्र एजाज नुरू (२३) या दोघांना खंडणीसाठी ओलीस ठेवून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार ९ आणि १० जुलै रोजी घडला. याप्रकरणी पोलिसांनी दीपक वैरागड आणि त्याचा साथीदार सोहेल पंजाबी याला आधीच अटक केली आहे. रिजवानकडून खंडणी उकळण्यासाठी त्याला आधी सोहेल पंजाबीच्या मैत्रिणीमार्फत ‘सेक्स’च्या जाळ्यात अडकवण्यात आले. ९ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ‘त्या’ तरुणीसोबत ते येऊरला गेले. तेव्हा त्यांना येऊरला नेणाºया रिक्षावाल्यानेच बंगल्याची सोय करून दिली. त्याबदल्यात त्याने चार हजार रुपये सांगितल्यानंतर त्याला एक हजार रुपये रिजवानने दिले.बंगल्यावर त्यांच्यात ‘संबंध’ आल्यानंतर दुसºयाच मिनिटांत तिथे दरवाजावर दीपक वैरागडसह तिघांनी थाप मारत धाड टाकली. त्यानंतर, दोघा कथित पोलिसांनी त्याच रिक्षाचालकासह तिला तक्रार देण्यासाठी वर्तकनगर पोलीस ठाण्यात नेले. रिजवान आणि बंगल्याबाहेर थांबलेला एजाज यांना दीपकने दम देण्यास सुरुवात केली. त्यावेळी दीपकने रिजवान आणि एजाजला वर्तकनगर पोलीस ठाण्यात आणले. तिथे त्यांना बाहेरच बसवून पुन्हा धमकावून रिजवानकडून १० हजार रुपये काढले. नंतर, त्याला आणखी १० लाखांच्या रकमेसाठी धमकावण्यात आले. त्यासाठी त्याला काल्हेर येथील लॉजवर ठेवून दीपकने त्यांना ९ जुलैच्या रात्री त्यांच्यावर टेहळणी केली. दुसºया दिवशी १० जुलैला पुन्हा त्यांना ताब्यात घेऊन वाशीला दोन लाख रुपये आणण्यासाठी नेल्यानंतर दरम्यानच्याच काळात या कटातील ‘त्या’ तरुणीने मंगळवारी रिजवानविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात रिजवानविरुद्ध अदखलपात्र तक्रार (एनसी) दाखल केली. त्यामुळे आपली तक्रार कशी खरी आहे, हे भासवून त्यांना रिजवानकडून पैसे काढता येणे शक्य होईल, असा त्यामागे हेतू होता.>चौघांचा शोध अद्याप सुरूचवाशी येथून भाड्याच्या कारने ही टोळी रिजवानसह वर्तकनगर येथे आल्यानंतर त्यांनी त्यातील ५० हजार रुपये तसेच आदल्या दिवशीचे १० हजार रुपये कोणाला दिले, याचाही शोध सुरूच आहे. दरम्यान, वैरागड आणि त्याचा साथीदार सोहेल पंजाबी या दोघांनाही शनिवारी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. रिक्षाचालक, साहेलची मैत्रीण आणि अन्य दोघे अशा चौघांचाही अद्याप शोध सुरूच असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचा सर्वत्र शोध सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.