शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

पालिका हेल्पलाइनला घणघण

By admin | Updated: July 12, 2016 02:33 IST

पाऊस असो किंवा नसो, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन क क्षाचा दूरध्वनी वारंवार खणखणत असतो. मागील १०० दिवसांत महापालिकेच्या हेल्पलाइनवर तब्बल

पंकज रोडेकर,  ठाणे पाऊस असो किंवा नसो, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन क क्षाचा दूरध्वनी वारंवार खणखणत असतो. मागील १०० दिवसांत महापालिकेच्या हेल्पलाइनवर तब्बल एक हजार एक दूरध्वनी आले. सर्वाधिक ५०० कॉल हे जूनमध्ये आले. या कॉलमध्ये आग आणि झाडे उन्मळून पडल्याचा घटना होत्या. त्याचबरोबर तीन बोगस कॉल होते. ठाणे महापालिका क्षेत्रात एखाद्यावेळी आपत्तीजनक परिस्थिती ओढवल्यास त्याला दोन हात करण्यात ठामपाने आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू केला आहे. तक्रारीसाठी काही हेल्पलाइन नंबर दिले आहेत. पावसाळ्यात येणाऱ्या आपत्तीला सामोरे जाण्यास आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज आहे. २४ तास सुरू असलेल्या कक्षाचा दूरध्वनी १०० दिवसांत जबरदस्त खणखणतोय. या हेल्पलाइनवर एक हजार एक कॉल आले आहेत. यामधील जवळपास ५५९ कॉल महापालिकेने तयार केलेल्या तक्रारीच्या टाइपमधील इतर तक्रारींमध्ये मोजण्यात आले आहे. आलेल्या तक्रारींची नोंद ठेवण्यासाठी २० तक्रारींचे कॉलम तयार केले आहेत. यामध्ये आग, शॉर्टसर्किट, झाडे पडणे, फांदी तुटून पडणे, स्लॅब-प्लास्टर-घर-फुटपाथ, बिल्डिंग किंवा तिचा कॉलम, नाला, भिंत आदी पडणे. गॅसगळती, बोगस, मॉकड्रील असे कॉलम तयार केले आहेत.पावसाळ्यात तक्रारींचा पाऊस पावसाळा सुरू झाल्यापासून महापालिका आपत्ती व्यवस्थापन क क्षाच्या हेल्पलाइनवर तक्रारींचा पाऊस पडू लागला आहे. जून महिन्यात तब्बल ४५९, जुलैमध्ये १३८ अशा विविध प्रकारच्या तक्रारी आल्या आहेत. यामध्ये जवळपास १५० झाडे उन्मळून पडली, तर पाणी तुंबण्याच्या ३९ तक्रारी आल्या आहेत. तीन ठिकाणी जमीन खचण्याच्या तक्रारी आल्या आहेत. मे-एप्रिलमध्ये ५०० तक्रारी मे आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांतही तक्रारींचा ओघ जास्त होता. मात्र, या दोन महिन्यांत इतर तक्रारी निम्म्यापेक्षा अधिकच होत्या. साधारणत: ३७० तक्रारी होत्या. परंतु, सर्वाधिक १०६ तक्रारी लहानमोठ्या आगीच्या नोंदवल्या आहेत. तर, ३० झाडे उन्मळून पडली आहेत.या घटनेत एकच जीवितहानीआतापर्यंत आलेल्या तक्रारींत काही प्रमाणात वित्तहानी झाली आहे. पण, जीवितहानी एकाच ठिकाणी झाली आहे. यामध्ये वृद्धाचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.