शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

शुद्धीकरणासाठी बायोसॅनिटायझर

By admin | Updated: April 6, 2016 01:58 IST

पाण्याच्या भीषण टंचाईमुळे राज्यातील जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे खेडी आणि उपनगरेही होरपळून निघाली आहेत. नैसर्गिक जलस्रोत बायोसॅनिटायझर पद्धतीने शुद्ध करू

मुरलीधर भवार, कल्याणपाण्याच्या भीषण टंचाईमुळे राज्यातील जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे खेडी आणि उपनगरेही होरपळून निघाली आहेत. नैसर्गिक जलस्रोत बायोसॅनिटायझर पद्धतीने शुद्ध करून त्यातील पाणी पिण्यायोग्य व पुन्हा वापरता येऊ शकते. त्यासाठी प्रोजेक्ट राबवण्याची तयारी जलतज्ज्ञ गुणवंत पाटील यांनी दर्शवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याकरिता पुढाकार घेतल्यास पाणीटंचाईवर मात करता येईल. तसेच प्रदूषित झालेले नैसर्गिक जलस्रोत वापरायोग्य करता येऊ शकतात, असा दावा पाटील यांनी केला आहे.बायोसॅनिटायझरचा शोध पुण्यातील डॉ. उदय भवाळकर यांनी लावला आहे. त्यांच्या संस्थेसाठी पाटील काम करीत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांची पाटील यांनी नुकतीच भेट घेतली. प्रदूषित झालेले जलस्रोत बायो सॅनिटायझरद्वारे शुद्ध करता येऊ शकतात, असा दावा त्यांनी यावेळी केला. कल्याण शहरातील काळातलाव एक किलोमीटर परिघाचा आहे. त्यात बराच मोठा जलसाठा आहे. तसेच उल्हास नदीतील जलपर्णीने जवळपास सात किलोमीटरचा परिसर व्यापला आहे. नाल्यांद्वारे मलमूत्रमिश्रित सांडपाणी थेट या नदीपात्रात सोडले जाते. हे प्रदूषण रोखण्यासाठी नदीत तसेच काळातलावात बायोसॅनिटायझरचा वापर केल्यास दोन्ही ठिकाणचे पाणी शुद्ध होईल. त्याचबरोबर उल्हास नदीच्या वाहत्या पाण्यात बायोसॅनिटायझरचा वापर अधिक उपयुक्त ठरू शकतो. त्यासाठी किमान ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे जलतज्ज्ञ गुणवंत पाटील यांनी पुढे सांगितले.