कासा : डहाणू तालुक्यातील कासा भागात दोन महिन्यांपासून एटीएम बंद असून बँकांमधून फक्त एका वेळेस चार ते पाच हजार रुपये मिळत असल्याने नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे जास्त पैशांची गरज असल्यास नागरिकांना २० ते २५ किमी. अंतरावर असलेल्या डहाणू, तलासरी अथवा बोईसर येथील एटीएममध्ये जावे लागते.नोटाबंदीचा ग्रामीण भागात मोठा आर्थिक परिणाम झाला आहे. बँका व एटीएम मुळातच येथे पुरेसे नाही व येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत खडखडाट आहे. बँक आॅफ महाराष्ट्रच्या बँकांच्या शाखेवर ५० गावांतील नागरिकांना अवलंबून राहावे लागते. तिलाही पुरेसा चलन पुरवठा नाही. शिक्षक, ग्रामसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारही या बँकांमध्ये जमा होतो. पण पैसे काढण्यावर निर्बंध आहेत. (वार्ताहर)
कासा परिसरात एटीएम बंद
By admin | Updated: January 12, 2017 05:56 IST