शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘एबीएल’चे ६ कोटींचे साहित्य पडून, चौकशीसाठी सदस्य सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 02:29 IST

- सुरेश लोखंडेठाणे : अ‍ॅक्टिव्हिटी बेस लर्निंग (एबीएल) या नावाचे नावीन्यपूर्ण मूल्यवर्धित शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने तीन वर्षांपूर्वी लागू केले. त्यासाठी लागणारे प्रिंटेड कार्ड, ट्रे आणि रॅक, टेबल आदी खरेदीसाठी १० कोटींपैकी सुमारे सहा कोटी रुपये खर्चही झाले. मात्र, त्याचा लाभ अद्यापही विद्यार्थ्यांना झाला नाही. अधिकाऱ्यांनी मनमानी करून ...

- सुरेश लोखंडेठाणे : अ‍ॅक्टिव्हिटी बेस लर्निंग (एबीएल) या नावाचे नावीन्यपूर्ण मूल्यवर्धित शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने तीन वर्षांपूर्वी लागू केले. त्यासाठी लागणारे प्रिंटेड कार्ड, ट्रे आणि रॅक, टेबल आदी खरेदीसाठी १० कोटींपैकी सुमारे सहा कोटी रुपये खर्चही झाले. मात्र, त्याचा लाभ अद्यापही विद्यार्थ्यांना झाला नाही. अधिकाऱ्यांनी मनमानी करून सेसचा निधी खर्च केल्याचा आरोप आता जिल्हा परिषदेच्या सदस्यांकडून होत आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्याचेही सध्या प्रयत्न सुरू आहेत.विभाजनानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना विलंब झाला. दरम्यानच्या काळात प्रशासकाद्वारे जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू होते. याच कालावधीत शिक्षण विभागाने सेस निधीतून सुमारे १० कोटी खर्चाचे ‘एबीएल’ हे नावीन्यपूर्ण शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सहा कोटी खर्चही झाले. मात्र, हे साहित्य शाळांमध्ये धूळखात पडून आहे. त्यावर, जि.प. सदस्यांनी लक्ष केंद्रित करून या घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्याचा निर्णयही घेतला. पण, प्रशासनाकडून अद्यापही त्यास प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.पुणे जिल्ह्यातील काही शाळांमध्ये हा एबीएलचा प्रयोग करण्यात आला होता. पण, तो यशस्वी झाला नव्हता. तरीदेखील तत्कालीन शिक्षणाधिकारी मीना यादव यांनी हट्ट करून ठाणे जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये एबीएल लागू केले. त्यास तत्कालीन प्रशासकांचाही पाठिंबा होता.काही शाळांमध्ये हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर करता आला असता. परंतु, मनमानी करून जिल्ह्यातील सुमारे एक हजार ३६३ शाळांमध्ये एकाच वेळी तो लागू केल्याने पूर्णत: फसला. महिनाभरही विद्यार्थ्यांना या एबीएलचे ज्ञान मिळाले नाही. सहा कोटींपेक्षा जास्त निधी खर्च झालेल्या या एबीएलचे मूल्यमापनही प्रशासनाने केले नाही. पण, आता हा विषय जोर धरून सदस्यांनी प्रशासनास अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.शासनाची परवानगी नाहीएबीएलचा हा खर्चिक प्रयोग करण्यापूर्वी प्रशासनाने राज्य शासनाची परवानगी घेणेही गरजेचे होते. शासनाच्या परवानगीशिवाय एबीएलच्या नावाखाली शिक्षण विभागाने साडेसहा कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च करण्याची मनमानी केल्याचा आरोप सध्या होत आहे. या घोटाळ्याची चौकशी करून संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांकडून आहे. प्रशासन मात्र हा विषय गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. समिती गठीत करण्याचा निर्णय होऊनही ती करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या वृत्तास जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष घरत यांनीही दुजोरा दिला आहे. दोषींना पाठीशी घालणाºया प्रशासनाने प्रतिसाद न मिळाल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचेही लोकमतला सांगितले.

टॅग्स :thaneठाणे