शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

७४० कंपन्यांकडून नियमांचा भंग

By admin | Updated: March 30, 2017 06:39 IST

औद्योगिक परिसरातील ‘प्रोबेस’ कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर कंपनीमालकांकडून मार्जिन स्पेसमध्ये

मुरलीधर भवार / डोंबिवलीऔद्योगिक परिसरातील ‘प्रोबेस’ कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर कंपनीमालकांकडून मार्जिन स्पेसमध्ये केल्या जाणाऱ्या अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. डोंबिवलीतील तब्बल ७४० कंपनीमालकांनी कंपनीच्या आवारातच अतिक्रमण केले असल्याची गंभीर बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. ‘वनशक्ती पर्यावरण संस्थे’चे कार्यकर्ते अश्वीन अघोर यांनी एमआयडीसीकडे माहितीच्या अधिकारात अतिक्रमणाची माहिती मागितली होती. मार्जिन स्पेसमध्ये प्रक्रिया करणारे बॉयलर उभारले जातात. त्यामुळे कामगारांसह कंपनीच्या आसपास असलेल्या नागरी वस्तीची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मे २०१६ मध्ये स्टार कॉलनीनजीक असलेल्या प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला. तेव्हा, हा स्फोट बॉयलरचा असल्याचे सुरुवातीला सांगण्यात येत होते. त्यानंतर, त्याठिकाणी सुरू असलेल्या वेल्डिंगच्या कामाची ठिणगी रसायनामध्ये पडली. त्यामुळे हा स्फोट झाला, अशी माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने माहितीच्या अधिकारात रहिवासी राजू नलावडे यांना दिली होती. प्रोबेस स्फोटाचे कारण शोधण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली असून ११ महिने उलटून गेले, तरी अद्याप समितीचा अहवाल तयार झालेला नाही. कंपन्यांचे मालक सुरक्षिततेचे नियम पाळत नाहीत आणि त्यांनी नियम पाळावेत, याकरिता एमआयडीसी, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून प्रभावी कारवाई होत नाही. मार्जिन स्पेसच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या कंपनीमालकांना गेल्या तीन वर्षांपासून नोटिसा बजावण्यात येत आहेत. एमआयडीसीने २००९ मध्ये विकास नियंत्रण नियमावली तयार केली आहे. या नियमावलीचे उल्लंघन होत आहे. मात्र, तरीही कंपनीमालकांविरोधात एमआयडीसी ठोस कारवाई करीत नाही. प्रोबेस स्फोटानंतर प्रदूषण मंडळाने कंपनीच्या शेजारील सहा कंपन्या बंद केल्या होत्या. तसेच महापालिकेने केवळ चार बेकायदा इमारतींवर हातोडा चालवण्याचे काम केले होते. नियमांचे उल्लंघन करून उभारलेल्या बॉयलरमुळे एखादी मोठी स्फोटासारखी दुर्घटना घडू शकते. काही वर्षांपूर्वी विनायका टेक्सटाइल कंपनीला लागलेल्या आगीत चार कामगारांचा जळून मृत्यू झाला होता. कारण, त्याठिकाणी संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग चिंचोळा होता. ज्वलनशील पदार्थ कंपनीत ठेवू नये व त्याचा साठा तळघरात करू नये, असे नियम असताना त्याचेही उल्लंघन होते. अतिक्रमण थांबेनाडोंबिवली एमआयडीसी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार फेज-१ व २ यामधील ७४० कंपनी मालकांकडून अतिक्रमण झाले आहे. जवळपास सगळ्याच कंपनीमालकांनी अतिक्रमण केल्याने अतिक्रमण करणाऱ्या कंपन्यांची यादी भलीमोठी आहे.